आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alapuja Coast Appeared Suspicious Boat Seized By The Coast Guard Personnel Were Brought Here Vijinjam

केरऴच्‍या किना-यावर आढळली संशायस्‍पद नौका; दहशवादी असल्‍याचा संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरूवनंतपुरम (केरळ) – येथील अलापुझा किना-यावर 'बारूकी' नावाची संशयास्‍पद नौकाआढळून आली असून, तिचा चालक इराणचा आहे. शिवाय एका‍कडे पाकिस्‍तानचे ओळखपत्र सापडले. या नावेत एकूण 12 व्‍यक्‍ती आहेत. त्‍यांच्‍याजवळ बंदी घातलेला उपग्रह फोनसुद्धा सापडला. त्‍यामुळे या व्‍यक्‍ती दहशवादी आहेत, का याची चौकशी केरळ पोलिस करत आहेत. त्‍यांना सध्‍या विझिनजाम येथे नेण्‍यात आले.

या बाबत नौदलाच्‍या एका अधिका-याने सांगितले, गुप्‍त माहितीच्‍या आधारे पोलिसांच्‍या मदतीने आपण नौदलाने ही नाव पकडली आहे. नावेतील व्‍यक्‍ती भारतात कशासाठी आल्‍यात, याची चौकशी सुरू असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.