आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समलैंगिक होता अल्‍लाउद्दीन खिलजी, चुलत बहीणीशी जबरदस्‍तीने केला होता विवाह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा पद्मावतीमध्‍ये अलाउद्दीनच्‍या भुमिकेत रणवीर कपूर. - Divya Marathi
सिनेमा पद्मावतीमध्‍ये अलाउद्दीनच्‍या भुमिकेत रणवीर कपूर.

जयपूर- सेन्‍सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न घेता संजय लिला भन्‍साळींनी चित्रपटाचे स्‍क्रीनिंग केल्‍याने वाद निर्माण झाला आहे. सेन्‍सॉर बोर्डानेही तांत्रिक कारणामुळे हा सिनेमा परत निर्मात्‍यांकडे पाठवला होता. सुत्रांनूसार, हा सिनेमा 1 डिसेंबररोजी रिजिज करण्‍याचा निर्मात्‍यांचा मनोदय होता. मात्र आता त्‍याचे प्रदर्शन पुढे ढकलण्‍याच आल्‍याची माहिती आहे. मात्र भन्‍साळींनी सिनेमाची स्‍क्रीनिंग केल्‍यानंतर मिडीयाकडे सिनेमाबद्दल अनेक तपशिल येत आहेत. त्‍यापैकी एक म्‍हणजे सिनेमामध्‍ये अल्‍लाउद्दीन खिलजीला एका क्रुर शासकाच्‍या भुमिकेत दाखवताना तो समलैंगिक असल्‍याचेही दाखवले आहे.

 

सिनेमात असे दाखवले आहे अलाउद्दीन खिलजीला

- मिडीया रिपोर्ट्सनूसार अल्‍लाउद्दीनला एक धुर्त, अहंकारी, कपटी, रक्‍तपिपासू व्‍यक्‍ती म्‍हणून सिनेमात दाखवण्‍यात आले आहे. 
- अलाउद्दीन आपल्‍या सम्राट काका जलालुद्दीनचा खून करतो. आपल्‍या चुलत बहीणीशी जबरदस्‍तीने विवाह करतो तसेच तो समलैंगिक आहे. 
- राणी पद्मावतीच्‍या सौंदर्याबद्दल सांगून चित्‍तौड गडावर हल्‍ला करण्‍यासाठी अलाउद्दीनला प्रेरीत करण्‍या-या राघव चेतन याचीही तो हत्‍या करतो. 
- अलाउद्दीन कपटाने महाराज रतन सिंह यांना दिल्‍लीला बोलावतो आणि त्‍यांना अटक करतो. मात्र राणी पद्मावती अलाउद्दीनला चकमा देत रतन सिंह यांना सोडवून आणते. 
- अलाउद्दीन आणि रतनसिंह यांच्‍या संघर्षामध्‍ये कुठेही धार्मिकता डोकवता नाही. केवळ देशी आणि विदेशी यांच्‍यामधील संघर्ष सिनेमात दिसतो. 


पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज... 

 

 

बातम्या आणखी आहेत...