आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समलैंगिक होता अल्लाउद्दीन खिलजी, चुलत बहिणीवरच केली होती बळजबरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - वादग्रस्त ठरलेल्या पद्मावती चित्रपटाला केंद्रीय फिल्म सर्टिफिकेशन बोर्ड (सीबीएफसी) च्या प्रमाणपत्राशिवाय विविध वाहिन्यांसाठी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगनंतर हा वाद आणखीनच वाढला आहे. पद्मावतीवरील वाद धुमसतच आहे. सेन्सॉर बोर्डानेही तांत्रिक कारणांमुळे सध्या चित्रपटाला निर्मात्यांकडे परत पाठवले आहे. यानंतर मीडियामध्ये या चित्रपटाबद्दल ज्या रिपोर्ट्स येत आहेत, त्यानुसार अलाउद्दीन खिलजीला समलैंगिक आणि क्रूर शासक सांगण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटात अलाउद्दीन एक धूर्त, अहंकारी, कपटी, चारित्र्यहीन व रक्तपिपासू व्यक्ती असल्याचे चित्रित करण्यात आले आहे. 
- अलाउद्दीन त्याचा काका सम्राट जलालुद्दीनचा खून करतो, आपल्या चुलत बहिणीशी बळजबरी लग्न करतो, तो समलैंगिकही असतो.
- तो त्या राघव चेतनचीही हत्या करतो, ज्याने त्याला पद्मावतीच्या अलौकिक सौंदर्याची कथा सांगून चित्तोडवर हल्ल्यासाठी प्रेरित केले होते.
- अल्लाउद्दीनने कपटाने महाराज रतनसिंह यांना दिल्लीला बोलावून अटक केली, परंतु शूर पद्मावती स्वत: दिल्लीला जाऊन अलाउद्दीनला चकवा देऊन रतनसिंह यांना सोडवून आणते.
- अलाउद्दीन आणि रतनसिंह यांच्या चकमकीत धर्म कुठेही येत नाही. हे प्रकरण स्वदेशी आणि विदेशीचे दिसते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...