आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Alert For Girls Molestation By Fake ID On Facebook Police Investigating Love Jihad

अलर्ट! फक्त \'या\' तरुणींना पाठवतो फ्रेंड रिक्वेस्ट; फसलेल्या 18 पैकी 14 जणींशी केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपीला या कामासाठी आखाती देशांतून पैसा येत असल्याचे समोर आले आहे. - Divya Marathi
आरोपीला या कामासाठी आखाती देशांतून पैसा येत असल्याचे समोर आले आहे.
अलाहाबाद - येथील सायबर सेल आणि करेली पोलिस टीमने एका तरुणाला अटक केली. अटक केलेला हा तरुण फेसबुकवर वेगवेगळ्या नावांनी फेक आयडी बनवून तरुणींना प्रेमजाळात ओढत होता. त्यांच्यावर रेप करून त्यांचा अश्लील व्हिडिओ तसेच फोटोही बनवत होता. मग सुरू व्हायचा ब्लॅकमेलिंगचा खेळ. या वेळी त्याने एका सरकारी कर्मचाऱ्याच्या बायकोला आपल्या प्रेमजाळात ओढून ब्लॅकमेल केले. पोलिसांनी तपास केल्यावर धक्कादायक सत्य समोर आले.
 
आतापर्यंत 18 तरुणींना फसवल्याची माहिती उघड...
- आतापर्यंत 18 तरुणी या नराधमाच्या जाळ्यात फसल्या आहेत. यात 3 इलाहाबादच्या आहेत, याचे सत्य समजल्यावरही बदनामीमुळे कुणीही तोंड उघडले नव्हते.
- त्याच्या ब्लॅकमेलिंगने त्रस्त होऊन एका पीडितेने हिंमत करून पोलिसांत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी या तरुणावर रेप, ब्लॅकमेलिंग, सायबर क्राइम आणि फोर्जरी अशा कलमांखाली एफआयआर दाखल केली आहे.
 
गुजरातच्या मोबाइल नंबरवरून फेसबुकवर बनवली फेक आयडी
- अलाहाबादच्या करेली परिसरात  राहणारे अन्सार अहमद रेल्वेतून रिटायर्ड आहेत. त्यांचा मुलगा शहनवाज अहमद बीए शिकून घरीच असतो.
- या शहनवाजने 7-8 महिन्यांपूर्वी गुजरातला जाऊन तेथील एक सिमकार्ड आणले. त्याच मोबाइल नंबरवरून त्याने फेसबुकवर अर्पित शर्मा, ईशांत शर्मा आणि शहनवाज नावाने अकाउंट बनवले.
- इंटरनेट आणि मोबाइलची विशेष माहिती असणारा शहनवाज अॅपच्या माध्यमातून तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत होता.
 
अगोदर केले रेप, मग बनवले अश्लील व्हिडिओ
- ऑगस्ट 2017 मध्ये शहनवाजने जॉर्जटाऊनमध्ये राहणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पत्नीशी फेसबुकवर मैत्री केली. त्याने महिलेला सांगितले की, तो विदेशात बिझनेस करतो, तेथे भारतीय महिलांची गरज आहे.
- फेसबुकवर चॅटिंग करून त्याने महिलेला जाळ्यात अडकवले. बिझनेस संबंधी बोलायचे म्हणून एक दिवस अर्पित शर्मा बनून सरकारी कर्मचाऱ्याच्या पत्नीला भेटायला पार्कमध्ये बोलावले.
- येथे त्याने महिलेवर रेप केला- अश्लील व्हिडिओ बनवला. मग मित्रासोबतही संबंध बनवण्यासाठी दबाव टाकला. नकार दिल्यावर तो चिडला. व्हिडिओ व्हायरल करतो आणि तो तुझ्या नवऱ्याकडे पाठवतो अशी धमकी देऊ लागला. यामुळे महिला भयभीत झाली आणि त्याच्या मागणीला बळी पडली.
 
फक्त हिंदू तरुणींना पाठवायचा फ्रेंड रिक्वेस्ट
- पोलिस तपासात हे तथ्य समोर आले की, शहनवाज केवळ हिंदू तरुणींनाच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. त्याच्या जाळ्यात आतापर्यंत अलाहाबादच्या 3, दिल्ली-मध्य प्रदेश-रायपूर आणि हिमाचल प्रदेशातीलही अनेक तरुणी- महिला फसल्या आहेत.
- एसपी क्राइम बृजेश मिश्रा म्हणाले की, शहनवाजने चौकशीत कबूल केले की, त्याने 18 तरुणींशी आधी मैत्री केली आणि त्यापैकी 14 जणींवर बलात्कार केला.
- शहनवाज वेस्टर्न युनियन मनी ट्रान्स्फरच्या माध्यमातून विदेशातून पैसे मागवायचा आणि तरुणींना आकर्षित करण्यासाठी खर्च करायचा.
- यामुळे आता पोलिसांनी 'लव्ह जिहाद'च्या अँगलनेही तपास सुरू केला आहे. 
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित बातमीचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...