आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Alert In Pathankot After A Suspicious Bag Containing A Uniform Found Near Military Station

पठाणकोट येथील तळावर बॅगेत सापडले लष्करी गणवेश, स्वॅट व सैन्याने चालवली संयुक्त शोधमोहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट  - पंजाबमध्ये पठाणकोट येथे मामून लष्करी तळाजवळ रविवारी एक संशयित बॅग आढळली. यात लष्करी गणवेश सापडले आहेत. यानंतर पठाणकोटमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.  गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात  हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ जवान शहीद झाले होते.
 
रविवारी एका स्थानिक व्यक्तीने पोलिसांना या संशयित बॅगेबद्दल प्रथम सूचना दिली होती. त्यानंतर पठाणकोट शहर आणि मामून छावणीत शोधमोहीम राबवण्यात आली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,  लष्कर व स्वॅट टीमने संयुक्तरीत्या संशयितांना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली. सापडलेल्या बॅगेत ५ शर्ट आणि पँट मिळाल्या आहेत. याच वर्षी मार्च महिन्यात गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पठाणकोट हवाई तळावर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता  आणि  सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात आढावा घेण्यात आला. गुप्तचर विभागास पठाणकोटमध्ये दहशतवादी  शिरले असून  विमानतळ आणि मामून छावणीजवळ दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, अशीही माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्कर, हवाई दल, पंजाब आणि हिमाचल प्रदेश पोलिसांच्या संयुक्त दलातील  ५०० जवानांनी  शोधमोहीम राबवली.  

पठाणकोट हवाई तळावर झाला होता दहशतवादी हल्ला   
२ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड जैश-ए महंमदचा प्रमुख मसूद अझहर हा होता.  १९९९ मध्ये झालेल्या कंदहार विमान अपहरणात प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात त्याची सुटका करण्यात आली होती. भारताने दहशतवाद्यांनी त्यांच्या हँडलर्सशी केलेल्या संभाषणाची माहिती आणि त्यांच्याकडे सापडलेल्या पाकिस्तानी बनावटीच्या साहित्याचे पुरावे शेजारी देशाकडे दिले होते. परंतु पाकिस्तानने याचा इन्कार केला. 
 
पुढील स्लाइडवर वाचापाकिस्तानकडून भारताने दिलेल्या पुराव्यांची पडताळणी  नाही... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...