आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aligarh Muslim University And Banaras University News In Marathi

एएमयू म्हणजे मुस्लिम, तर बीएचयू हिंदू आहे का?, दोन मोठ्या विद्यापाठांची निवडणुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - हिंदूंच्या दृष्टीने सुरक्षित आहे, म्हणून नरेंद्र मोदी येथून निवडणूक लढवत आहेत का? गेल्या निवडणुकीत माफिया मुख्तार अन्सारी यांच्यावर डॉ. मुरली मनोहर जोशींनी 17 हजार मतांनी विजय मिळवला. बनारस हिंदू विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून या शहराचा ‘मूड’ समजून घेतला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन एकेकाळी बीएचयूचे कुलगुरू होते. भारतरत्न प्रो. सी.एन. आर. राव यांनी येथेच शिक्षण घेतले. अल्लामा इक्बालांचेही शिक्षण इथलेच.


जमिलाच्या घराण्यात कोणीच महाविद्यालयात गेले नाही. पण जमिला उर्दूत पीएचडी करत आहे, तेही बनारस हिंदू विद्यापीठातून. ती अशी एकटीच नाही. मदरशात शिक्षण घेतलेले मौलाना सिराजुद्दीन यांच्यासह देश-विदेशातील 100 विद्यार्थी उर्दू साहित्याचे शिक्षण घेण्यासाठी येथे येतात. या विद्यापीठाचे जगभर नाव आहे, त्यामुळे इथेच शिक्षण घेण्याची इच्छा होती, असे सिराजुद्दीन सांगतात. बीएचयू वाराणसीचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची शान आहे.
बीएचयूचा 1916 मध्ये स्थापना झाली तेव्हापासून असाच चेहरा आहे. तेव्हा पंडित मदनमोहन मालवीय यांनी अरबी, फारसी आणि उर्दू विभागाच्या प्रमुखपदी फैज बनारसी यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर मौलवी महेश प्रसाद यांनी 1953 पर्यंत हा विभाग सांभाळला. त्यांनीच मिर्झा गालिब यांच्या पत्रांचा शोध लावला. विद्यार्थी वाढल्याने 1970 मध्ये अरबी, फारसी, उर्दूचे स्वतंत्र विभाग झाले. प्रो. आफताब अहमद आफाकी म्हणाले, त्या वेळी मुस्लिमांच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे सर सय्यद अहमद यांचे लक्ष केवळ मुस्लिम समुदायावर होते. मात्र, मालवीय यांचा दृष्टिकोन जास्त मोठा होता. उर्दू पोस्ट ग्रॅज्युएट कोर्समध्ये त्यांनी एक प्रश्नपत्रिका हिंदीत ठेवली व हिंदी असणा-यांसाठी उर्दू हा ऐच्छिक विषय. हिंदू विद्यापीठ केवळ नाव आहे, मात्र आम्ही रमजान महिन्यात रोजा इफ्तार येथेच करतो, असे ते म्हणतात.
धर्म आणि भाषेची भिंत नसलेले बीएचयू ही भारताची खरी ओळख आहे. येथे आयुष्यातील सर्व विचारांना समान स्थान आहे. ख-या हिंदुत्वाचा अर्थही असाच आहे.


बनारसच्या फक्कड आणि धर्मनिरपेक्ष स्वभावाची ओळख बीएचयू आहे. मोदी यांच्यामुळे ती हिंदू अशी होणार नाही.
बीएचयू हिंदू विद्यापीठ कसे? इथे केवळ उर्दूच नव्हे, तर बीएचयूच्या 12 विभागांमध्ये असा एकही विभाग नाही, ज्यात मुस्लिम विद्यार्थी आणि प्राध्यापक नाहीत. - आर.यू. खान, निवृत्त प्रोफेसर, आयआयटी, बीएचयू