आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Blood Groups Use Jaundice Child, Dr.D.C. Sharma's Research

कावीळ : बाळांना चालतील सर्व रक्तगट, ग्वाल्हेरचे डॉ. डी. सी. शर्मांनी शोधली नवी पद्धत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - नवजात मुलांच्या काविळीच्या गंभीर प्रकरणात सध्या आई अथवा नवजात अर्भकाच्या गटाचे रक्तच पीडित शिशूला दिले जात आहे. पण आता कोणत्याही गटाचे रक्त नवजात मुलाला देता येऊ शकेल. ग्वाल्हेरचे डॉ. डी. सी. शर्मा यांनी ही पद्धत शोधून काढली आहे. तिला ‘एक्स्चेंज ट्रान्सफ्युजन बाय रिकॉन्स्टिट्यूटेड ब्लड’ असे म्हटले जाते.नव्या पद्धतीमुळे नवजात बाळाला दिल्या जाणा-या रक्तात पुरेशा प्रमाणात हिमोग्लोबीन असेल व संसर्गाचा धोकाही नसेल. डॉ. शर्मा गजराराजा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीआरएमसी) ब्लड बँकेचे इंचार्ज आहेत. या चाचणीत डॉ. अजय गौड, डॉ. सुनीता राय आदी सहभागी झाले.

५०० मुलांवर चाचणी
नव्या पद्धतीची चाचणी ५०० मुलांवर करण्यात आली. ती यशस्वीही झाली. सध्या आई अथवा नवजात मुलाच्या गटाचे रक्त कावीळग्रस्त मुलाला दिले जाते. काविळीच्या प्रकरणात रक्तगट मॅच न झाल्याने आईच्या रक्ताद्वारे संसर्ग होण्याचा धोका असतो. नवजाताच्या गटाचे रक्त न मिळाल्यास अडचणी वाढतात. या नव्या पद्धतीत असे होणार नाही.

अशी असेल नवी पद्धत
एक्स्चेंज ट्रान्सफ्युजन बाय रि कॉन्स्टिट्युटेड ब्लड पद्धतीत ओ (पॉझिटिव्ह वा निगेटिव्ह) रक्तगटाच्या पेशीत एबी गटाचा प्लाझ्मा मिळवला जातो व शिशूचे पूर्ण रक्त बदलले जाते. हिमोग्लोबीनमध्ये वाढ वा घट करता येते.

कशाने होते कावीळ
याला हिमोलिटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न म्हणतात. लाल रक्तपेशींचे विभाजन झाल्याने बिलिरुबिन तयार होते. नवजात मुलाचे यकृत बिलिरुबिन पूर्णपणे बाहेर टाकू शकत नाही आणि ते शरीरात जमा होत जाते.

कावीळ झालेल्या नवजाताचे रक्त बदलल्यानंतर वेळोवेळी हिमोग्लोबीनची तपासणी करणे व मुलाच्या विकासावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
- डॉ. अजय गौड, बालरोगतज्ज्ञ, जीआरएमसी