आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिमांची वाढती संख्या विकासाला अडसर- साध्वी प्राचीचे वादग्रस्त विधान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची मिटींग - Divya Marathi
फाइल फोटो - मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची मिटींग
लखनौ - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त देशभरात आयोजित कार्यक्रमात 'ऊं' आणि योगासंबंधीच्या इतर मंत्रांचा उच्चार करण्यात आला यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने हे प्रकरण सुप्रीम कोर्टात नेणार असल्याचे म्हटले आहे, तर भाजप नेत्या साध्वी प्राची यांनी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड विकासात अडथळा असल्याचा आरोप केला आहे. बोर्डावर लवकरात लवकर बंदी आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.
साध्वी प्राची यांनी dainikbhaskar.com सोबत बोलताना सांगितले, की उलेमांना चांगले वाटावे यासाठी 'ऊं' च्या उच्चारणावर बंदी घालता येत नाही. त्या म्हणाले, मंत्रोच्चार आणि सूर्य नमस्कार हिंदूंची अनेक वर्षांची परंपरा आहे. जर ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाला कोर्टात जायचे असेल तर ते जाऊ शकतात. त्यांना कोणीही आडवलेले नाही. साध्वींनी पुढे जाऊन असे म्हटले, की देशातील मुस्लीम लोकसंख्या विकासात फार मोठा अडथळा ठरत आहे. ज्या मुस्लीमांना योग आणि 'ऊं' च्या उच्चारण करायचे नसेल त्यांनी जगातील 177 देश सोडून कुठेही जावे, कारण या सर्व देशांनी योगाला मान्यता दिली आहे आणि ते योग करत आहेत.
भाजप उपाध्यक्ष ओम माथूर
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच लखनौला पोहोचलेले उत्तर प्रदेश भाजप प्रभारी ओम माथूर यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डावर निशाणा साधला. ते म्हणाले, योग बद्दल ज्यांना आक्षेप असतील त्यांनी नक्कीच कोर्टाचे दार ठोठवावे . योगाला 48 मुस्लिम राष्ट्रांनी पाठिंबा दिला आहे. याला कोणत्याही जाती-धर्माशी जोडू नये.
पुढील स्लाइडमध्ये, खासदार आदित्यनाथांनी साधला निशाणा
बातम्या आणखी आहेत...