आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांत तिरंगा ध्वज फडकवा’ उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेचे निर्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेने राज्यातील सर्व मदरशांना एक पत्र जारी केले आहे. १५ ऑगस्टला मदरशात तिरंगा ध्वज फडकवण्यात यावा आणि राष्ट्रगीत गायनही करावे, असे निर्देश पत्रात देण्यात आले आहेत. या पत्रावरून वाद निर्माण झाला आहे. ३ जुलैला जारी केलेले हे पत्र सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. पत्रात १५ ऑगस्टचे सर्व कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, सकाळी ८ वाजता ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत होईल. ८.१० वाजता स्वातंत्र्य संग्रामातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. 

या पत्रात सर्व मदरसा संचालकांना कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. हे पत्र निबंधक राहुल गुप्ता यांच्यामार्फत जारी करण्यात आले आहे.

मौलाना फिरंगा महलींनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह 
ऐशबाग ईदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांनी सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या या  निर्देशांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून देशभरातील सर्व मदरशांमध्ये दरवर्षी स्वातंत्र्य सोहळा साजरा केला जातो. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत गायनही होते.
बातम्या आणखी आहेत...