आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरला, फुटीरतावाद्यांनी मिनी सचिवालयला लावली आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर येथे सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक झाली. - Divya Marathi
श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर येथे सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक झाली.
श्रीनगर - पन्नासहून अधिक दिवसांपासून अशांत असलेल्या काश्मीरवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या नेतृत्वातील 30 खासदारांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ रविवारी श्रीनगर येथे पोहोचले. दोन दिवसांचा हा दौरा असणार आहे. मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी फुटीरतावाद्यांनाही निमंत्रण दिले आहे. मात्र फुटरीरतावादी ऑल पार्टी मिटिंगला विरोध करत आहेत. शोपियां येथील मिनी सचिवालयाच्या निर्माणाधिन इमारतीला प्रदर्शकांनी आगीच्या भक्ष्यस्थानी दिले आहे.

शिष्टमंडळात कोण-कोण
- केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ श्रीनगरल आले आहे.
- काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी काय-काय करता येईल याची चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ वेगवेगळ्या समुदायांच्या लोकांना भेटणार आहे.
- शिष्टमंडळात राज्यसभेतील काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, अबिंका सोनी काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा समावेश आहे.
- जेडीयू नेते शरद यादव, सीपीएमचे सीताराम येचुरी आहेत.
- एनडीएकडून अर्थमंत्री अरुण जेटली, रामविलास पासवान श्रीनगरला पोहोचले आहेत.
काय म्हणाले शिष्टमंडळातील नेते ?
- गुलाम नबी आझाद म्हणाले, 'आम्हाला आशा आहे की शिष्टमंडळ काश्मीर समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी होईल. शिष्टमंडळ, काश्मीर आणि देशासाठी महत्त्वाचे ठरेल.'
- रामविलास पासवान म्हणाले,'आम्ही ओपन माइंडने जात आहोत. जे लोक घटनेच्या चौकटीत बोलण्यास तयार आहेत त्यांच्यासोबत चर्चा होईल.'
- सीपीएम नेते येचुरी म्हणाले, 'हे दोन महिन्यांपूर्वी व्हायला हवे होते. मात्र अजूनही आशा आहे की आम्ही काही चांगले करु शकू.'
सीएम मेहबुबांनी फुटीरतावाद्यांना लिहिले पत्र
- शनिवारी मेहबुबांनी फुटीरतावाद्यांना पत्र लिहिले. या पत्रानुसार, 'मी हे पत्र जम्मु-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाची अध्यक्ष म्हणून लिहित आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी आपणही निमंत्रीत आहात. परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने ही चांगली सुरुवात होऊ शकेल.'
बातम्या आणखी आहेत...