आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व विद्यापीठांमध्ये ग्रेडिंग सिस्टिम राबवणार, कुलगुरूंची बैठक, कार्यशाळेत शिक्कामोर्तब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - नव्या शैक्षणिक सत्रापासून देशभरातील सर्व विद्यापीठांत ग्रेडिंग सिस्टिम (मानांकन पद्धत) सुरू होणार आहे. सर्वप्रथम ती पदव्युत्तर अभ्यासक्रमांत निवडीचा पर्याय म्हणून उपलब्ध केली जाईल.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशांनुसार १० एप्रिलला मुंबई विद्यापीठात देशभरातील कुलगुरूंची बैठक व कार्यशाळा झाली. सीबीएसई, अभियांत्रिकी, आयआयटीत आधीच ग्रेडिंग सिस्टिम लागू आहे. मात्र, आजही बहुतांश विद्यापीठांत विभागवार गुणांकन होत असल्याने गुणवत्ता यादीत अडचणी येतात.