आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Women Highway Bandit Gang Arrested In Karnataka

ट्रक ड्रायव्हरांना लुटणारी पहिली \'ऑल वुमन गॅंग\' गजाअाड, हायवेवर होती सक्रीय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु- राज्यातील महामार्गावर ट्रक चालकांना थांबवून त्यांच्याकडून हजारों रुपये लुटणार्‍या एका टोळीला कर्नाटक पोलिसांनी गजाआड केले. या टोळीत सर्व महिला आहेत. राज्यातील मुख्य महामार्गावर सक्रीय असलेली या टोळीचे नाव 'ऑल वुमन गॅंग'आहे. ट्रकचालकांमध्ये या गॅंगची मोठी दहशत आहे. ही टोळी गुजरात, पंजाब आणि हरियाणातून येणार्‍या ट्रक चालकांनाच टार्गेट करत होत्या, असे पोलिसांनी सांगितले आहे.
ऑल वुमन गॅंग प्रमुख राजाबाई (60) सह नीलाबाई (45), पल्लवी(22), राधिका(35), गंगा(20) आणि सरिताला (20) पोलिसांनी अटक केले आहे. गॅंगच्या इतर सदस्यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ट्रकचालकांना तीक्ष शस्त्राची भीती दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच किमती वस्तू लुटत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक 4 (चेन्नई-मुंबई), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 (अकोला-गूटी) यासह राज्यातील प्रमुख मार्गावर वुमन गॅंगने ट्रकचालकांना लुटले आहे. अनेक ट्रकचालकांकडून तक्रारी मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून वुमन गॅंगमधील काही सदस्यांना गजाआड केले.

पोलिसांनी सांगितले की, वुमन गॅंगची काम करण्याची स्टाइल हटके आहे. महामार्गावरील टोलनाक्यावर टोळीची म्होरकी राजाबाई उभी राहायची. ट्रकचालक आणि क्लीनरला भेटून पुढील गावापर्यंत लिफ्ट मागून ट्कमध्ये बसायची. दोन ते तीन किलोमीटर अंतरावर गंगा आणि सरिता या दोन्ही रस्त्यावर उभ्या असायच्या. राजाबाईच्या इशार्‍यावर त्या काम करायच्या. गंगा आणि सरिता या दोन्ही सेक्स वर्कर म्हणून ट्रक चालकांना आपल्या जाळ्यात अडकून त्यांना सुनसान ठिकाणी नेऊन त्याच्याजवळील रोख रक्कम आणि मोल्यवान वस्तू लुटल्या जायच्या.