आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटित मुलीलाही अनुकंपावर नोकरीचा हक्क- अलाहाबाद उच्च न्यायालय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद - घटस्फोटित मुलीलाही अनुकंपा नियमानुसार नियुक्ती मिळवण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वाचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यासाठी अनुकंपा नियमावलीत आवश्यक ते बदल करावेत, अशी सूचनाही न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला केली आहे. सध्या अविवाहित आणि विधवा मुलीलाच अनुकंपाच्या आधारावर नोकरी मिळत आहे. न्यायमूर्ती अमित स्थालेकर यांनी रूबू मन्सुरीच्या याचिकेवर शुक्रवारी हा आदेश दिला.
न्यायालयाने म्हटले आहे की, ‘घटस्फोटित मुलीला अनुकंपा कोट्यातून नोकरी न देणे अन्याय आहे. विधवेप्रमाणेच घटस्फोटित महिलेलाही पती नसतो. त्यामुळे तिला वडिलांच्या घरी राहावे लागते.’ न्यायालयाने राज्य सरकारला चार महिन्यांत नियमांत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

घटस्फोटित मुलीला अनुकंपा कोट्यातून नियुक्ती देण्यास व्यापार कर विभागाने नकार दिला होता. सेवा नियमावलीत घटस्फोटित मुलीला अनुकंपा धर्तीवर नोकरी मिळवण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही, फक्त अविवाहित आणि विधवा मुलींनाच तो अधिकार आहे, असे या विभागाने म्हटले होते.