आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहतकच्या 'त्या' भगिणींचे आरोप खोटे, पोलिसांनी कोर्टात सादर केले चार्जशिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कथित छेडछाडीची शिकार झालेल्या रोहतकच्या भगिणी - Divya Marathi
कथित छेडछाडीची शिकार झालेल्या रोहतकच्या भगिणी
रोहतक - हरियाणामध्ये चालत्या बसमध्ये सोनीपतच्या दोन बहिणींच्या कथित छेडछाड प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. दोन बहिणींनी तीन मुलांवर छेडछाडीचा आरोप केला होता, मात्र पोलिस तपासाअंती त्यांच्या आरोपांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ज्या महिलेने छेडछाडीनंतरच्या हाणामारीचा व्हिडिओ शूट केला होता त्या महिलेने देखील छेडछाड झाल्याचा आरोप फेटाळला आहे. पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या चार्जशीटमधून हा खुलासा झाला आहे.
पोलिसांनी सादर केलेले चार्जशिट पॉलीग्राफिक टेस्ट, फॉरेंसिंक फिजियोलॉजिकल असेसमेंट आणि इतर तपासाच्या आधारे तयार केले आहे. पोलिसांनी चार्जशिटमध्ये आरोपी मुलांचे जबाब हे ट्रूथफूल (सत्य) असल्याचे म्हटले आहे तर, ज्या दोन बहिणींनी आरोप केले त्यांच्या जबाबाबद्दल पोलिसांनी भ्रामक आणि कपटपूर्ण असा शेरा दिला आहे. या प्रकरणाशी संबंधीत पाच इतर लोकांचेही जबाब नोंदवून घेण्यात आले होते. दोन्ही बहिणींनी व्हि़डिओ तयार करण्यासाठी मोबाइल दिला होता का या प्रश्नाला नकारार्थी उत्तर दिले मात्र ज्या महिलेने व्हिडिओ शूट केला तिचा दावा आहे, की या बहिणींनीच तिला व्हिडिओ शूट करायला सांगितला.
कोर्टात पॉलिग्राफिक टेस्ट काहीही महत्त्व नाही
तपास यंत्रणा सत्य शोधनासाठी लाय डिटेक्शन टेस्ट (पॉलिग्राफिक), नॉर्को आणि ब्रेन मॅपिंग या सारख्या टेस्ट करतात. या तिन्ही चाचण्यांमध्ये लाय डिटेक्शन टेस्ट सर्वाधिक विश्वासार्ह्य समजली जाते. मात्र, कोर्टात या चाचण्या ग्राह्य धरल्या जात नाही. त्यांना फारसे महत्त्व दिले जात नाही. कारण सुप्रीम कोर्टाने अब्दुल रहीम तेलगी प्रकरणात या चाचण्या बेकायदेशीर ठरवत त्यांच्या विश्वासार्ह्रतेवर प्रश्न उपस्थित केले होते. कोर्टाचे म्हणणे आहे, की या तिन्ही चाचण्या घटनेच्या कलम 20 (3) चे उल्लंघन आहे.

पुढील स्लाइडमध्ये, पाहा संबंधीत फोटो