आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alvida Namaz Ramzan Procession Administration Tight Route Diversion

VIDEO & PICS: लखनौमध्ये शिया आंदोलकांवर जोरदार लाठीमार, एकाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लखनौमध्ये शिया आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न करणारी पोलिस यंत्रणा.)
लखनौ - उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आजम खान हे वक्फ बोर्डाला संपवण्याच्या प्रयत्नात असल्याने त्यांना या पदावरून पायऊतार करण्यात यावे, अशी मागणी करत आज लखनौमध्ये शिया मुस्लिमांनी उग्र आंदोलन केले.
लखनौमध्ये अलविदा जुम्माचा नमाज वाचल्यानंतर मौलाना कल्बे जव्वाद यांनी हजारो अनुयायांना घेऊन शिया वक्फ बोर्डमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात निदर्शने केली. वक्फमंत्री आजम खान यांच्या विरोधात जमावाने जोरदार घोषणा दिल्या. पाहता पाहता जमलेल्या गर्दीने दगडफेकही सुरू केली. पीएसीच्या गाडीसमवेत तीन माटारसायकलींना आग लावली. या घटनेचे वार्तांकन करणार्‍या माध्यमांच्या प्रतिनिधींनाही जमावाने मारहाण केली. त्यांचे कॅमेरे तोडले.
जमावाचे हिंसक रुप लक्षात आल्यावर पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर जवळपास 10 गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये तीन मौलानांचा समावेश आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली असून तो मुफ्तीगंज येथील रहिवासी आहे. कर्रार मेहंदी रिजवी (वय 55) असे त्याचे नाव आहे. त्याला चार मुली आहेत. लाठीमारात जखमी झाल्यानंतर त्याला ट्रामा सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला.
रिजवी याच्या मृत्यूने चिडलेल्या जमावाने समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत रिजवी यांच्या मारेकर्‍यांना तुरूंगात टाकत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहिल, असे या लोकांचे म्हणणे आहे. जमावाने संपूर्ण शहराचे कामकाज विस्कळित करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. शहरातील वाढता तणाव लक्षात घेता प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. शहारातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या हजरतगंज येथील दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या घटनेबद्दल कल्बे जव्वाद म्हणाले की, रोजेदारांवर लाठीमार करून समाजवादी पार्टीने दाखवून दिले आहे की, त्यांना मुस्लिमांची किती काळजी आहे. आता आम्ही ईदपर्यंत येथेच आंदोलन करणार आहोत. संपूर्ण प्रदेशातून शिया मुस्लीमांना लखनौला बोलावण्यात आले आहे.
पुढे पाहा आंदोलनातील व्हिडीओ आणि फोटो...