आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Am A Strong Contenders For CM Post: Siddaramaiah

कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण? के. सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खर्गेमध्ये चुरस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु/ नवी दिल्ली- कर्नाटकात काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले असून, त्याचा कर्नाटकाचा नवा मुख्यमंत्री कोण? अशी चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेते के. सिद्धरामय्या, केंद्रीय कामगारमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांची नावे आघाडीवर आहेत.

कर्नाटकातील काँग्रेसच्या या विजयामागे सिद्धरामय्या यांनी चांगलीच मेहनत घेतली असून, त्याचे बक्षिस त्यांना हायकमांडकडून मिळेल, असे दिल्लीतूनही सांगितले जात आहे. सिद्धरामय्या यांनी विधानसभा निवडणुकीसाठी चांगला 'होमवर्क' केल्याचे पुढे आले आहे. त्यांनीच आज सकाळी आठ वाजताच मतमोजणीला सुरुवात होताच काँग्रेस राज्यात सत्तेवर येईल व पक्षाला 120 पेक्षा जास्त मिळतील, असे सांगितले होते. सिद्धरामय्या यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसला 121 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागेल, असे बोलले जाते. त्यातच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी नवनियुक्त आमदार ज्यांची निवड करतील तो मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य केल्याने सिद्धरामय्या यांना संधी मिळू शकते. मात्र, कधी काळी ते देवेगौडांच्या जनता दलात असल्याने 'बाहेरचा व्यक्ती' असा शिक्का राहुल गांधी यांच्याकडूनच बसू शकतो. त्यामुळे ही बाजू त्यांच्या आड येऊ शकते.

असे असले तरी 64 वर्षीय सिद्धरामय्या यांनी सहाव्यांदा विधानसभेत प्रवेश केला आहे. तसेच ते अलीकडे गांधी घराण्याचे जवळचे म्हणूनही गणले जावू लागले आहेत. याचबरोबर ते कुरुबा समाजाचे आहेत. हा समाज कर्नाटकात लिंगायत याच्यानंतर दुस-या क्रमांकावर आहे. त्यामुळे जाती-पातीचे राजकारणही त्याच्या उपयोगी पडणार आहे. मागील पाच वर्षापासून ते विधानसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहत आहेत.

मुख्यमंत्रीपदाबाबत सिद्धरामय्या यांनी सांगितले की, हायकमांड जो निर्णय घेईल तो योग्य असेल. मात्र मी एक प्रबळ दावेदार आहे. मागील पराभावातून आम्ही धडा घेतला असून, येथील जनतेला स्थिर, स्वच्छ व लोकाभिमूख सरकार हवे आहे. ते काम काँग्रेस पक्ष करेल, असे सिद्धरामय्यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर, कर्नाटकमधून मुख्यमंत्री होऊ शकतात, असे अनेक वरिष्ठ नेते आहेत. यात केंद्रीय पेट्रोलियमंत्री विरप्पा मोईली, लघु आणि मध्यम अवजड उद्योगमंत्री के. एच. मुनिप्पा, वक्कलिंगा समाजाचे व सहा वेळा विधानसभेत पोहचलेले डी.के. शिवकुमार, माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा समावेश आहे.

कामगारमंत्री मल्लिकार्जुन खर्गे आणि जी. परमेश्वरा यांनाही मिळू शकते संधी? वाचा पुढे... क्लिक करा...