आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आम्ही स्लीपर्स आहोत का?; वापरल्या अन् फेकून दिल्या’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - कर्नाटकच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्याने अभिनेेते अंबरीश चांगलेच संतप्त झाले आहेत. ‘आम्ही काय स्लीपर्स आहोत काय की वापरल्या आणि फेकून दिल्या?’ अशी थेट विचारणाच त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना केली आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करताना १४ मंत्र्यांची हकालपट्टी करून १३ नव्या मंत्र्यांचा समावेश केला होता. हकालपट्टी झालेल्या मंत्र्यांत अंबरीश यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहत आहेत. हकालपट्टी झालेल्या मंत्र्यांचे समर्थक ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. अंबरीश यांनी तर सोमवारी आमदार पदाचा एका ओळीचा राजीनामाच आपल्या वैयक्तिक सचिवामार्फत विधानसभा अध्यक्षांना पाठवून दिला आहे. मात्र, अंबरीश यांनी स्वत: राजीनामा सादर न केल्याने तो स्वीकारण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना अंबरीश म्हणाले, ‘आम्हाला मंत्रिमंडळातून सन्मानजनक पद्धतीने वगळायला हवे होते. माझा फक्त त्यालाच आक्षेप आहे, बाकी काही नाही. आम्ही काय स्लीपर्स आहोत का, की वापरल्या आणि फेकून दिल्या? मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मला वाईट वागणूक दिली आहे. मंत्रिमंडळातून वगळण्यात येत असल्याची साधी माहितीही त्यांनी मला दिली नाही. ही हुकूमशाही आहे की हिटलरचे राज्य? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
बातम्या आणखी आहेत...