आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरसिंह यांचा ‘गृहप्रवेश’ निश्चित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - समाजवादी पार्टीतून हकालपट्टी करण्यात आलेले माजी सरचिटणीस अमरसिंह पुन्हा पक्षात परतणार आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. सपाकडून समर्थन मिळवून अपक्ष उमेदवार म्हणून ते पुन्हा राज्यसभेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
अमरसिंह यांच्यासोबत बॉलीवूड अभिनेत्री तसेच रामपूरच्या माजी खासदार जयाप्रदादेखील सपामध्ये दाखल होऊ शकतात. ४ जुलै रोजी उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर ११ सदस्य निवृत्त होणार आहेत. सभागृहातील विद्यमान सदस्य संख्येच्या आधारे सपाचे सहा सदस्य प्रथम पसंतीच्या मतांनी निवडून येऊ शकतात. ते सपाच्या तिकिटावर तीनवेळा राज्यसभेचे सदस्य होते. मंत्री आझम खान यांचा विरोध असतानाही मुलायम यांनी त्यांना पक्षात सामील होण्यास मंजुरी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रवेशामुळे पक्षात नवचैतन्य येईल.
बातम्या आणखी आहेत...