आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amar Singh, Mulayam Singh Yadav To Share Dais After 4 Years

अमर-मुलायम जोडी 4 वर्षांनंतर पुन्हा एकत्र!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - समाजवादी पार्टीतून बाहेर पडल्यानंतर तब्बल चार वर्षांनी राज्यसभा खासदार अमरसिंह आणि सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह एकाच व्यासपीठावर दिसून आले. समाजवादीचे दिवंगत नेते जनेश्वर मिश्र यांच्या जयंतीनिमित्त लखनऊमधील जनेश्वर मिश्र पार्कच्या उद्घाटन कार्यक्रमात हे दोघे मंगळवारी एकत्र आले. मात्र, आपली उपस्थिती वैयक्तिक असून याच्याशी राजकारणाचा संबंध नसल्याचे अमरसिंहांनी स्पष्ट केले.

अमरसिंहांची ‘मुलायम’ वाणी : जनेश्वर मिश्र पार्क उभारल्याप्रकरणी अमरसिंहांनी मुलायमसिंह व त्यांचा मुलगा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे अभिनंदन केले. यासोबतच 2010 मध्ये समाजवादीतून बाहेर पडण्यापूर्वी आपण मुलायमसिंहांच्या निकटवर्तीयांपैकी एक असून अजूनही ‘मी मुलायमवादी’ असल्याचे संकेत दिले. तसेच या मुलायमसिंहांच्या विनंतीवरूनच आपण या कार्यक्रमाला आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे समाजवादी पार्टीतील अमरसिंह यांचे कट्टर शत्रू उत्तर प्रदेशचे मंत्री मोहंमद आझम खान हे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

अमरसिंह हे एकेकाळी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सचिव होते. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोक दलातर्फे त्यांनी उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री येथून निवडणूक लढली. मात्र, यात त्यांचा पराभव झाला. अमरसिंहांचा राज्यसभेचा कार्यकाळही या वर्षी संपेल. 2 फेब्रुवारी 2010 मध्ये अमरसिंह व जया प्रदा यांना समाजवादी पार्टीने बाहेरची वाट दाखवली होती. बेशिस्त वर्तणुकीमुळे पक्षाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.