आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलायम-अखिलेश एक होते आणि एक राहातील, सपामधील भांडण प्री-प्लॅन ड्रामा - अमरसिंह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - समाजवादी पक्षातून बाहेर काढलेले अमरसिंहांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अखिलेश आणि मुलायम यांच्यात कोणतेही भांडण नाही. ते कालही एक होते आणि पुढेही राहातील. निवडणुकीपूर्वी रंगलेले समाजवादीमधील भांडण हे पूर्वनियोजित नाटक असल्याचा दावा अमरसिंह यांनी केला आहे. 
 
वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहाण्यासाठी प्रसिद्ध अमरसिंह यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक मध्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा मोठा खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला की समाजवादी पक्षात काही दिवसांपूर्वी झालेला वाद पूर्वनियोजीत होता. ते म्हणाले, की यादव कुटुंबात झालेला कलह एक ठरवून केलेले षडयंत्र होते. याची स्क्रिप्ट स्वतः मुलायमसिंह यांनी लिहिली होती. मुलायमसिंह आणि अखिलेश कालही एकत्र होते आणि आजही एक आहेत. 
 
ड्रामामध्ये प्रत्येकाला रोल दिला... 
- अमरसिंह यांनी मंगळवारी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, 'समाजवादी पक्षात जे काही झाले तो प्री-प्लॅन ड्रामा होता. त्यात प्रत्येकाला रोल दिला गेला होता. मला आता कळायला लागले आहे की माझा फक्त वापर केला गेला.' 
- अमरसिंह म्हणाले, मला वाटते हे सर्व विरोधीलाट, कायदा सुव्यवस्था यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी केले गेले होते. 
- मुलायमसिंहांच्या तीन कमजोरी आहेत. मुलगा, सायकल आणि सपा. मुलाकडून पराभूत झाल्याचे त्यांना कोणतेही शल्य नाही. 
- मतदानाला संपूर्ण यादव कुटुंब एकत्र गेले होते, मग हे सर्व नाटक का ? असा सवाल त्यांनी केला. 
 
अखिलेश यांची प्रतिमा उजळ करण्यासाठी नाटक 
- अमरसिंह म्हणाले, हा सर्व ड्रामा अखिलेश यांची प्रतिमा उजळ करण्यासाठीचा प्रयत्न होता. मुलायम यांना माहित होते की निवडणुकीत लोकांसमोर जाताना त्यांना सांगण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही. त्यामुळे त्यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी हे सर्व केले. 
 
अखिलेश यांनी केले होते पक्षातून बाहेर 
- अखिलेश यादव यांनी पक्ष ताब्यात घेतल्यानंतर अमरसिंह हे यादव कुटुंबा बाहेरील व्यक्ती असल्याचे सांगत तेच कुटुंबात भांडण लावत असल्याचे म्हटले होते. 
- अखिलेश यांनी अमरसिंहांना पक्षातून बरखास्त केले होते. 
- अखिलेश यांनी वडील मुलायमसिंह आणि काका शिवपाल यांच्याविरोधात बंड केले होते. तेव्हा अमरसिंह मुलायमसिंहासोबत होते. 
 
पक्षातून काढल्यावर काय म्हणाले होते... 
- अखिलेश यादव यांनी अमरसिंहाची पक्षातून हकालपट्टी केली तेव्हा त्यांनी मुलायमसिंहांसोबत कालही प्रामाणिक होतो आणि पुढेही राहिल असे म्हटले होते. 
- अमरसिंहांनी तेव्हा म्हटले होते, की अंबानी भावांमध्ये झालेले भांडणही माझ्यामुळेच झाल्याचे म्हटले गेले होते. जया - अमिताभ बच्चन वेगळे राहातात तेही माझ्यामुळेच. मीच त्यांच्यात भांडण लावले आहे, असेही बोलले गेले होते.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...