आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमर सिंह कडाडले, म्हणाले, पक्षानेच आम्हाला मूूक-बधीर बनवले, तर खासदारकीचा राजीनामा?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- समाजवादी पक्षाचे राज्‍यसभेचे खासदार अमर सिंह यांनी पक्षाविरोधात दंंड थोपटले आहे. राज्यसभा सदस्यत्त्वाच्या बदल्यात पक्षाने अपमानित केल्याचा आरोप अमर सिंह यांनी केला आहे. यासंंदर्भात लवकरच मुलायम सिंह यांच्याशी चर्चा करणार असून वेळ पडल्यास खासदारकीचा राजीनामा देेईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

सपमध्ये माझ्यासोबत अनेकांचा होताय अपमान...
- 'आजतक'ला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सिंह यांनी सांगितले की, 'राज्यसभेेत आम्हाला मूक-बधिर बनवले आहे. आम्हाला बोलू दिले जात नाही. आम्ही मागील बाकावर बसून केवळ नरेश अग्रवाल आणि सुरेंद्र नागर यांचे भाषणेे ऐकण्याचेे काम करतो.'
- 'मी समाजवादी नााही, मुलायमवादी आहे. पण हे आधी निश्चित करावे लागेल की, मुलायम सिंह नेते आहेत की नाही. पक्षाने माझ्यासोबत जया प्रदा, बलराम यादव आणि शिवपाल यादव यांना देखील अपमानित केले आहे.'
- मायवती सरकारच्या काळात जेे होत होते, तेच अखिलेश सरकारच्या काळात होत आहे. लोक ऐश करत करत असल्याचे अमर सिंंह यांनी म्हटले आहे.

- सपमध्ये मुलायम सिंह यांच्या सांगण्यावरून आलो होतो, आता त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पुुढील निर्णय घेईल.
- दरम्यान, अमर सिंह आणि जया प्रदा यांची फेब्रुवारी 2010 मध्ये समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. दोघांंना 2011 मध्ये राष्ट्रीय लोकमंच पक्षाची स्थापना केली होती. उत्तर प्रदेशात झालेल्या निवडणुकीत 403 पैकी 360 जागांवर लोकमंंच पक्षाने आपले उमेदवार उभे केले होते. पण त्यापैकी एकही उमेेदवार निवडूून आला नव्हता.
- अमर सिंह यांनी मार्च 2014 मध्ये राष्ट्रीय लोक दलात प्रवेश केला होता. लोकसभा न‍िवडणुकीत फतेहपूर सीकरीमधून निवडणूक लढवली होती. पण त्यांना तिथे पराभवाचा सामना करावा लागला. नंतर त्यांनी पुन्हा सपमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले आहे.
बातम्या आणखी आहेत...