(फोटो: अमरनाथाचे हिम शिवलिंग.फोटोग्राफर- अंकुर सेठी)
जम्मू- अमरनाथ यात्रेला जाणार्या शिवभक्तांसाठी खुशखबर आहे. यात्रेकरूंना यंदा 20 ते 22 फूटांच्या हिमलिंगाचे दर्शन घडणार आहे. हिमलिंगाचा आकार कायम ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याचे यात्रा बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले.
अमरनाथ यात्रेस दोन जुलैपासून प्रारंभ होत आहे. यात्रेदरम्यान काश्मीर खोर्यात यंदा
हिमवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच वर्तवली आहे. सुमारे 14500 फूट उंचीवर असलेल्या अमरनाथाची हिमलिंग तयार होण्यास सुरवात झाली आहे. हिमवृष्टी होत असल्यामुळे यंदा थंडी खूप आहे. तसेच शिवभक्तांची संख्या जास्त असणार आहे. त्यामुळे यात्रा बोर्डसमोर संरक्षणाचे मोठे आव्हान असणार आहे.
काश्मीर खोर्यात कडाक्याची थंडी असल्याने हिमलिंगाच्या सुरक्षेसाठी सुरक्षाजवान तैनात करण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा बोर्डने
आपले सुरक्षापथक तैनात केले आहे. सध्या येथील तापमान उणे 15 डिग्री सेल्सियसपेक्षाही खाली आले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, हिमलिंगाचे छायाचित्रे....