श्रीनगर- जम्मू व काश्मीरमध्ये वार्षिक अमरनाथ यात्रा बालटाल शिबिर तळावरून गुरुवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. दरडी कोसळल्याने पुढील मार्ग बंद झाले होते. त्यामुळे चार दिवस ही यात्रा थांबवण्यात आली होती. आता भाविकांना गंदेरबल जिल्ह्यात मणिग्राम तळावरून उत्तर काश्मीरमधील बालटालकडे जाण्याची परवानगी देण्यात आली. यानंतर काश्मीरच्या पहलगाम व बालटाल या दोन्ही तळांवरून यात्रा पुढे मार्गस्थ झाली आहे. दोन दिवस आधीपासूनच श्रीनगर - लेह महामार्गवर एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.
२.७० लाख भाविकांनी आतापर्यंत घेतले दर्शन
२८ यात्रेकरूंचा यात्रा काळात मृत्यू