आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Hanging Lepakshi Temple Made Misty For British Officers

AMAZING: हवेत तरंगतात या मंदिराचे 70 खांब, इंग्रजही शोधू शकले नाही रहस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - घर असेल मंदिर असेल, कोणत्याही इमारतीचा डोलारा हा खांबावर उभा असतो. आंध्रप्रदेशात मात्र एक असे मंदिर आहे ज्याचे खांब हवेत तरंगतात. तरीही अनेक शतकांपासून हे मंदिर उभे आहे. जगाला या मंदिराविषयी असलेल कुतुहल अजूनही संपलेले नाही.
आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील लेपाक्षी मंदिर हँगिंग पिलर्स (हवेत झुलणारे खांब) करीता जगात प्रसिद्ध आहे. या मंदिरात 70 हून अधिक पिलर्स हे कोणत्याही सहाऱ्याशिवाय उभे आहेत, एवढेच नाही तर मंदिरही त्यांनी तोलून धरले आहे. येथे येणारे हजारो पर्यटक ही अद्भूत कलाकृती पाहून अचंभित होत असतात. भक्तांची धारणा आहे, की या खांबाखालून कापड निघाले म्हणजे सुख-समृद्धी लाभते. या खांबांचे रहस्य जाणून घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. इंग्रजांनाही यांनी भूरळ घातली पण ते देखील या झुलणाऱ्या खांबाचे रहस्य शोधू शकले नाही.
कसे पडले लेपाक्षी हे नाव
लेपाक्षी या नावामागे एक अख्यायिका आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात होते, तेव्हा सीता आणि लक्ष्मण त्यांच्यासोबत होते. रावणाने सीतेचे अपहरण करुन जेव्हा तिला लंकेला घेऊन चालला होता, तेव्हा जटायू या पक्षाने रावणाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत युद्ध केले, पण रावणाच्या माऱ्यापुढे जटायू घायाळ झाला आणि खाली कोसळला. पक्षीराज जटायू ज्या ठिकाणी पडला तेच हे ठिकाण. सीतेच्या शोधात जेव्हा राम तिथे आला तेव्हा जायबंदी जटायूला पाहून त्यांच्या तोंडून निघालेले शब्द होते 'ले पाक्षी'. ले पाक्षी म्हणत त्यांनी जटायूला जवळ घेतले. ले पाक्षी हा तेलुगु शब्द असून त्याचा अर्थ होतो, 'उठ पक्षा'.

इंग्रजांनी घेतला होता शोध
16व्या शतकात निर्माण झालेल्या या मंदिराचे रहस्य जाणून घेण्याचा मोह शोधक बुद्धीच्या इंग्रजांना झाला नसता तरच नवल. त्यांनी तरंगत्या खांबांचे रहस्य जाणून घेण्यासाठी या मंदिराला शिफ्ट करण्याचाही प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. 1583 मध्ये विजयनगरच्या राजासाठी काम करणाऱ्या विरुपन्ना आणि विरन्ना या दोन भावांनी या मंदिराचे निर्माण केले. पौराणिक कथांमध्ये अगस्त ऋषिने हे मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे.

लेपाक्षीमध्ये अनेक वैशिष्ट्ये
16व्या शतकात तयार झालेल्या या मंदिरात महादेव, विष्णू आणि वीरभद्र या तीन देवांची वेगवेगळी मंदिरे आहे. या मंदिरात एक भव्य नागलिंग आहे. विशेषम्हणजे एकाच दगडात ते कोरण्यात आले आहे. भारतातील ते सर्वात मोठे नागलिंग मानले जाते. काळ्या ग्रेनाइटमध्ये तयार करण्यात आलेल्या या मूर्तित एक शिवलिंग देखली आहे. ज्यावर सात नाग फणा काढून आहेत. दुसरीकडे रामपदम (श्रीरामाच्या पाऊलखुना असल्याचे मानले जाते) आहे. तर, काही लोकांचे म्हणणे आहे, की हे माता सीतेच्या पायांचे ठसे आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिराची खास वैशिष्ट्ये