आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंश केलेल्या सापाला दोन दिवस दोरीने बांधून ठेवले, हे प्रसंगही वाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोरबा - छत्तीसगडमध्ये खोडरी तालुक्यातील लहंगाबहरा येथील ६० वर्षीय शेतकरी लहरीराम हा शेतात काम करत असताना त्याला साप चावला. शेतकऱ्याने सापाला पकडले आणि त्याच्या तोंडाला चक्क दोरीने बांधले व हा शेतकरी घरी घेऊन आला. घरी आल्यानंतर शेतकरी बेशुद्ध पडला.

साप चावल्यानंतर विष उतरण्यासाठी लहरीरामला झाडपाल्याची औषधी खाऊ घालण्यात आली. काही जण त्याला रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत होते; परंतु तो त्यासाठी तयार झाला नाही. अखेर ग्रामस्थांनी बळजबरीने त्याला दवाखान्यात दाखल केले. तेथे दोन दिवसांनी त्याला सुटी देण्यात आली. घरी परतल्यानंतर लहरीरामने बांधलेल्या सापाला जंगलात नेऊन सोडून दिले. सापाला का बांधून ठेवले, असे लहरीरामला विचारले असता त्याने सांगितले की, मला चावलेल्या सापाने इतर कुणाला चावा घेतला असता तर सापदेखील कुठल्या कारणाने मेला असता आणि साप मेला असता तर मग मीही जिवंत राहिलो नसतो. त्यामुळे मी सापाला घरी घेऊन आलो आणि त्याला बांधून ठेवले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, विषारी सापाचा शेतक-याला दंश, सापाचा तडफडून मृत्‍यू, शेतकरी सुखरूप.., इतर तीन आश्‍चर्यकारक प्रसंग..
बातम्या आणखी आहेत...