आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबेच्या श्रीयंत्राने होतात सोळा शंृगार,पूजेच्या वेळी मातेच्या डोळ्यांवर बांधली जाते पट्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजी - गुजरातच्या अंबाजी माता मंदिराच्या चाचर चौकात हजारो भक्तांची गर्दी आरतीसाठी उसळली आहे. अचानक आरती थांबते. देवीच्या मूर्तिस्वरूप शृंगारावर अचानक पडदा टाकला जातो. ही आगळीवेगळी परंपरा आहे. पुजारीदेखील मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधतात. त्यानंतर श्रीयंत्राने गुप्त पूजा सुरू होते. शक्तिपीठ अंबाजीमध्ये श्रीयंत्राला मूर्तिरूपात पुजले जाते.

अंबाजीकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर नवरात्र सुरू होते. पदयात्रींची गर्दी दिसू लागते. कुणाच्या हाती १० फूट, कुणाजवळ १०० तर काहींजवळ १००१ फुटांचा ध्वज असतो. ध्वज घेऊन सर्व भक्त मंदिराच्या दिशेने येतात. दुरूनच अंबेची ५२ फूट पताका दिसू लागते. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद येथून आणलेल्या फुलांनी मंदिर सजवले जाते. गेल्या महिन्यातच येथे ७ दिवसांचा मेळा झाला होता. यात २८ लाख भक्त दर्शनासाठी आले होते. शारदीय नवरात्रात दररोज ६० ते ७० हजार भक्त दर्शनासाठी येतात. शनिवार-रविवारी हीच संख्या एक लाखापर्यंत जाते. नवरात्रात गुजरातचे शेतकरी आपल्या कुटुंबासह देवीच्या दर्शनासाठी एकत्रित येतात.

नवरात्रात बेसनापासून बनणारे ६५ हजार मोहनथाल प्रसादाच्या रूपात वाटले जातात. भक्तांद्वारे देवीला १५०० च्या जवळपास साड्या चढवल्या जातात. मंदिराच्या गर्भगृहात बटुक भैरव-काल भैरव आणि बाला त्रिपुरासुंदरीच्या मूर्ती आहेत. सोबतच गणपतीही येथे सहकुटुंब विराजमान आहे. देवीचे मूळ स्थान गब्बर पर्वतावर असून हे स्थान मंदिरापासून ५ किमी अंतरावर आहे. वरती जाण्यासाठी रोप-वे व पायी असे दोन्ही पर्याय आहेत. गब्बर परिक्रमेच्या मार्गावरच ५१ शक्तिपीठांची स्थापना केली आहे. दर महिन्यात पौर्णिमा व अष्टमी तिथींना मातेचे विशेष पूजन होते. येथे ‘भवई’ व ‘गरबा’ नृत्यांसह ‘सप्तशती’ पाठाचे आयोजनही केले जाते.

१०८ किलो सोन्यापासून ४८ फुटांचे शिखर
अंबाजी मंदिरात १०८ किलो सोन्यापासून ४८ फूट कळस तयार करण्यात आला. आता ३५ किलो सोन्याची गरज आहे. यातील १७ किलो मंदिर ट्रस्टकडे आहे. संपूर्ण कळस सोन्याचा करण्यासाठी १२,२७१ किलो तांबेही वापरले आहे.
बातम्या आणखी आहेत...