आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukesh And Anil Ambani In Global Investors Summit

EXCLUSIVE PIX : अंबानी बंधू कार्यक्रमासाठी एकत्र, एकाच टेबलवर केले LUNCH

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये लंचदरम्यान मुख्यमंत्री दोन्ही अंबानी बंधुंना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले. सोबत सायरस मिस्त्री, गौतम अडाणी, शशी रुइया आणि वायसी देवेश्वर हे आहेत.

इंदूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितर राहणार असल्यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानांच्या आग्रहामुळे देशातील दोन सर्वात मोठे उद्योगपती भाऊ ग्लोबल इनव्हेस्टर्स समिटमध्ये सहभागी झाले. तसेच दोघे एका मंचावरही उपस्थित होते. मात्र मंचावर दोघे एकमेकांना ओळखत नसल्यासारखे वागले. हे दोघे भाऊ म्हणजेच मुकेश आणि अनिल अंबानी.

मध्यप्रदेश सरकारने आयोजित केलेल्या या समिटचे मुख्य आकर्षण अंबानी बंधुचे एकाच मंचावर येणे हेही होते. सोहळ्यांत सगळ्यांच्याच नजरा या दोन्ही भावांवर खिळलेल्या होत्या. कारण दोन्ही भावांची बॉडी लँग्वेज कशी असेल किंवा ते एकमेकांशी कसे वागतील याबाबतही सगळ्यांनात उत्सुकता होती.

ते एका मंचावर तर आले पण नात्यात आलेला दुरावा मात्र कायम असल्याचे जाणवले. कारण दोघांनी औपचारिपणे एकमेकांना नमस्कारही केला नाही. अनिल अंबानी काहीसे उशीरा सोहळ्यात पोहोचले. त्यांनी शेजारी बसलेलेल टाटा ग्रुपचे सायरस मिस्त्री यांच्याशी हात मिळवला. पण दोघे भाऊ एकमेकांशी अनोळखी असल्यासारखेच वागत होते. त्यात मुकेश अंबानी भाषण देत असताना अनिल अंबानी डोळे बंद करून बसले होते, त्यामुळे हे अधिक प्रकर्षाने जाणवले.

त्याआधी ज्यांनी भाषण केले होते, ती सर्व अनिल अंबानींनी अधिक काळजीपूर्वक ऐकली होती. पण मुकेश बोलत असताना आपले लक्षच नसल्याचे दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते. दोघांनीही एकमेकांचे भाषण संपल्यानंतर टाळ्या वाजल्या. तसेच उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि उद्योग मंत्री यशोधरा राजे सिंधिया यांच्याबोरबर त्यांनी भोजनही केले. पण मंचावर त्यांनी दाखवलेला अनोळखीपणा सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय ठरला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTO