आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक काँग्रेसमध्ये बंड; आमदाराचा राजीनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशातील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्येही आता काँग्रेस अडचणीत येण्याच्या स्थितीत आहे. मंत्रिमंडळात करण्यात आलेल्या फेरबदलामुळे नाराज काँग्रेस आमदार एम. एच. अंबरीश यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला असून आणखी ८ आमदार बंडखाेरीच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही.

अंबरीश यांनी अन्य व्यक्तीच्या हाताने राजीनामा पाठवल्याने तो परत पाठवण्यात आल्याचे विधानसभेचे उपसभापती शिवशंकर रेड्डी यांनी म्हटले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी रविवारी मंत्रिमंडळातील १४ मंत्र्यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश केला. त्यामध्ये अंबरीश यांचा समावेश होता. दरम्यान, मंत्र्यांना हटवण्यात आल्याने कर्नाटकात समर्थकांनी जागोजागी आंदोलन सुरू केले आहेत. मात्र, या कारवाईचे संकेत पक्षश्रेष्ठींनी आधीच दिले होते, असे समजते.
बातम्या आणखी आहेत...