आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America And Pakistan Embassy Were On Hit List Of SIMI Terrorist

पाक, अमेरिकेचे दूतावास होते सिमी दहशतवाद्याच्‍या निशाण्‍यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पकडलेल्‍या 'सिमी'चा सदस्‍य अबू फैझलने भारतात मोठा घातपात घडविण्‍याचा कट रचला होता. भारतातील अमेरिका आणि पाकिस्‍तानी दूतावासांना बॉम्‍बस्‍फोटाने उडविण्‍चाची योजना त्‍याने आखली होती. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेही त्‍याच्‍या निशाण्‍यावर होते. फैझलच्‍या चौकशीनंतर ही माहिती उघड झाली आहे. त्‍याने दोन्‍ही देशांचे दूतावास आणि गृहमंत्र्यांची रेकीही केली होती.

सुत्रांच्‍या माहितीनुसार, अबू फैझलचा पाकिस्‍तानातील तहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेसोबत संबंध होता. ते आणखी बळकट करण्‍यासाठी त्‍याने भारतात मोठा घातपात घडविण्‍याची योजना आखली होती. त्‍यासाठी तो देशातील प्रमुख स्‍थान तसेच काही बड्या व्‍यक्तींना लक्ष्‍य करणार होता. पाकिस्‍तान सरकार अमेरिकेच्‍या दबावाखाली मुस्लिम कट्टरवादी संघटनांविरुद्ध कारवाई करते. अमेरिकेला धडा शिकविण्‍यासाठी सिमी आणि इंडियन मुजाहिदीनच्‍या सदस्‍यांनी अमेरिकेत जाऊन घातपात घडविण्‍याचीही योजना आखली होती.