आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Ex President Bill Clinton Visit To India

उत्तर भारतातील सर्वात मोठे किचन, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती देणार भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अक्षयपात्र फाऊंडेशनच्या स्वयंपाकघरात बनणार्‍या पोळ्या)
जयपुर - केवळ तीन तासात पाच हजार पोळ्या, 6 टन दाळ आणि 5 टन भात तयार करणार्‍या नॉर्थ इंडियाच्या सर्वात मोठे स्वयंपाक घर ‘अक्षयपात्र’ च्या कार्यपध्दतीला पाहण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन हे 16 जुलैला जयपूरला येणार आहेत. या भेटीदरम्यान ते या स्वयंपाकघराच्या स्कूल लंच प्रोग्रॅममध्येही सहभागी होणार आहेत. या स्वयंपाकघरातून जयपूरमधील एक लाख चाळीस हजार शालेय मुलांना आणि 493 शाळांना जेवण पुरवले जाते.
आपल्या भेटीदरम्यान क्लिंटन ग्लोबल हेल्थ, क्लायमेट चेंज आणि आर्थिक विकासावरही चर्चा करणार आहेत. 16 ते 23 जुलैला होणार्‍या या भेटीमध्ये भारतासोबतच व्हिएतनाम, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यू गिनिया इत्यादी देशांमध्येही ते जाणार आहेत. हा कार्यक्रम क्लिंटन ग्लोबल इनिशिएटीव्ह कमिटमेंट टू अॅक्शनचाच भाग आहे. जो अक्षयपात्र आणि देशपांडे फाऊंडेशनशी जोडलेला आहे.
एका तासात 40 हजार पोळ्या
या स्वयंपाक घरात 300 लोक कामाला आहेत, तर बंद डब्यातील हे जेवण शाळेत पोहोचवण्यासाठी 150 लोक आणि 65 गाड्या आहेत. स्वयंपाक घराचे मॅनेजर ऑपरेशन्स अमित केशव सांगतात की, या स्वयंपाक घरात महिन्याभराचा मेनू फूड ऑफिसर आणि न्यूट्रीटेटीव्ह ऑफिसर यांच्या चर्चेने ठरतो. तर पोळी बनवण्यासाठी आणि तांदूळ धूण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. पोळ्या बनवण्याची मशीन एका तासात चाळीस हजार पोळ्या तयार करते. तसेच जेवणाचा दर्जा कायम रहावा यासाठी तांदूळ 90 डिग्री सेल्सियसवर उकळवले जाते.
सकाळी चार वाजता सुरू होतो स्वयंपाक
शाळेत सकाळी 7:30 वाजेपर्यंत जेवण पाठवण्यासाठी स्वयंपाकघर पहाटे 4 वाजताच सुरू होते. स्वयंपाका करणार्‍या कार्यकर्त्यांपैकी एक बलवीर सिंह सांगतात की, हे स्वयंपाक घर दोन भागात विभागले आहे. ड्राय किचनमध्ये आम्ही पोळ्या बनवतो, तर दुसरीकडे असलेल्या किचनमध्ये दाळ आणि भाजी तयार होते. तर 1200 लीटरच्या पाच कंटेनर्समध्ये दररोज 6 हजार लिटर दाळ बनवण्यात येते.

पुढील स्लाईडमध्ये पहा.. अक्षयपात्र स्वयंपाकघराचे फोटो...