आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Obama In India : भारतात चार अब्ज डॉलर गुंतवणार, सीईओ फोरममध्ये ओबामांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - सीईओ फोरममध्ये नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा.
नवी दिल्ली - भारत दौर्‍यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सायंकाळी दोन्ही देशांतील प्रमुख कंपन्यांच्या सीईओंच्या बैठकीत सहभागी झाले. दोन्ही देशांतील व्यावसायिक नाते अधिक दृढ करण्याचा उद्देश या बैठकीमागे होता. यावेळी दोन्ही नेत्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.
मोठ्या प्रोजेक्टवर स्वतः नियंत्रण ठेवणार असल्याचे यावेळी ओबामा म्हणाले. तसेच चांगल्या करविषयक कायद्यांचेही आश्वासन मोदींनी दिले. तर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांनी भारतात चार अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. दोन्ही देश एकत्रितपणे विकास आणि समृद्धीच्या मार्गावर पुढे वाटचाल करू शकतात, असे ओबामा म्हणाले. दोन्ही देशांदरम्यानचे व्यावसायिक नाते 'स्वाभाविक' असल्याचे सांगत H-1B व्हिसासह महत्त्वाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचेही ओबामा म्हणाले. जाणून घ्या, बैठकीतील महत्त्वाच्या बाबी...
सीईओ फोरमच्या बैठकीत नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा.
- भारतातील क्रयक्षमता वाढावी यासाठी दोन्ही देशांच्या उद्योगपतींना इन्फ्रास्ट्रक्चर आणि कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची विनंती पंतप्रधानांनी केली. भारत संपूर्ण जगाला एक कुटुंब मानत असून एकमेकांना सहाय्य करण्यावर विश्वास असल्याचेही ते म्हणाले.

- मोदी म्हणाले, सरकारने कसे काम करावे आणि त्याबाबत गुंतवणूकदारांना काय वाटते हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. पंतप्रधानांनी समस्यांच्या विरोधात आवाज बोलण्याबाबत व्यावसायिकांचे आभार मानले.

- सर्व व्यावसायिक समस्यांचा तोडगा गुड गव्हर्नंसमध्ये आहे. त्यामुळे अधिक चांगली वातावरण निर्मिती करण्याच्या दिशेने सरकार काम करत असल्याचेही मोदी म्हणाले.

- सरकारचा उद्देश सव्वाशे कोटी भारतीयांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्याशी संबंधित सर्व योजनांना प्राधान्य देणे ही प्राथमिकता असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.

- ओबामा म्हणाले की, दोन्ही देशांमधील नाते हे स्वाभाविक आहे. केवळ अमेरिका गुंतवणूक करत नसून अनेक भारतीयही अमेरिकेत गुंतवणूक करत असल्याने उत्साह अधिक वाढला असल्याचेही ओबामा म्हणाले.

- मोदी आणि मी आम्ही दोघेही लाभदायक कायद्यांच्या मताचे आहोत. विकास केवळ जीडीपीवरून ठरत नाही. तर सामान्य लोकांचे जीवनमान अधिक चांगले बनवणे याचाही त्यात समावेश होतो, असेही ओबामा म्हणाले. भारताला अधिक पुढे नेण्यासाठी उपयोगी येईल असे तंत्रज्ञान दोन्ही देश मिळून निर्माण करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
- ओबामांची घोषणा : अमेरिकेची एग्जिम बँक विविध प्रोजेक्टससाठी 1 अरब डॉलरची मदत करेल. यूएस ट्रेड अँड डेव्हलपमेंट एजंसीही रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्ससाठी 2 अब्ज डॉलर देईल. त्याशिवाय अमेरिकेतील ओव्हरसीज प्रायव्हेट इनव्हेस्टमेंट कॉर्पोरेशन भारताच्या मागास ग्रामीण भागात लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एक अब्ज डॉलरचे कर्ज देइल.

- गेल्या काही वर्षात भारत आणि अमेरिकेतील व्यापारात 60 टक्क्याने वाढ होऊन तो 100 अब्ज डॉलरवर पोहोचला अशल्याचेही ओबामांनी सांगितले. अमेरिका हा भारतात गुंतवणूक करणारा सहावा सर्वात मोठा देश आहे. 2025 पर्यंत दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यवसाय 500 अब्जापर्यंत पोहोचवणे हे त्यांचे लक्ष्य आहे.

- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची महत्वाकांक्षी योजना 'मेक इन इंडिया'ला केंद्रस्थानी ठेवत या बैठकीचे आयोजन केले होते. यात द्विपक्षीय व्यावसायिक नाते अधिक दृढ करण्याच्या मुद्यावर चर्चा झाली.

- अमेरिकेचे 30 बिझनेस लीडर्सही या बैठकीत सहभागी झाले होते. त्यात पेप्सिकोच्या इंद्रानी नूई, मॅकग्रा हिल फायनांशिअल कंपनीचे चेअरमन हैरॉल्ड मॅकग्रा, मास्टरकार्डचे सीईओ अजय बग्गा यांचाही त्यात समावेश आहे.

- भारतातील कंपन्यांचे 17 सीईओ या बैठकीत सहभागी झाले होते. त्यात टाटा सन्सचे सायरस मिस्त्री, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी आणि त्यांचे छोटे भाऊ अनिल अंबानी, भारतीय समुहाचे सुनील मित्तल, आयसीआयसीआयच्या चंदा कोचर यांचाही त्यात समावेश आहे.

- 2013-2014 मध्ये दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार 61.64 अब्ज डॉलरपर्यंत गेला आहे. एप्रिल 2000 ते नोव्हेंबर 2014 यादरम्यान भारतात अमेरिकेकडून एफडीआयच्या मार्फत 13.28 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बिझनेस समिटपूर्वी ओबामांसाठी राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या चहापार्टीचे PHOTO