आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त प्रतीक्षा करायला लावताे ताेच व्हीआयपी, अमेरिकन सल्लागाराचा भारताबाबत ब्लाॅग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा - ‘भारतात सर्वसामान्यांना मोठी प्रतीक्षा करायला लावणा-यांनाच जास्त महत्त्व आहे. मग त्यामुळे कामाचे वाटोळे झाले तरी ते त्यांच्या खिजगणतीतही नसते.’ अमेरिकन सल्लागार क्रिस्टोफर बॅरी यांनी आपल्या नोकरशहांबद्दल केलेली ही टिप्पणी. राजस्थान सरकारसोबत फक्त ६ महिने काम केल्यानंतरची ही प्रतिक्रिया. ते अवयव प्रत्यारोपण सल्लागार होते. अमेरिकेला परतलेल्या बॅरी यांनी ‘डोंट वरी अबाऊट द गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स’ या ब्लॉगमध्ये ही टिप्पणी केली.
नोकरशहा-डॉक्टरांबद्दल लिहिले, डोक्यात स्फोट होईल असा अनुभव
तुमचा वेळ वाया घालवून मी किती ताकदवान आहे, हे सांगू द्या : मी एका अत्यावश्यक बैठकीत होतो. चर्चेदरम्यान एका नोकरशहाने आपल्या सहायकाला पत्र लिहिण्यासाठी चर्चाच थांबवली. त्याने १० मिनिटे वाया घालवली. भारतात हे नेहमीचेच आहे, असे मला समजले.

माझ्या मोठेपणाला आव्हान देऊ नका : भारतीय लोक व्हीआयपी होऊ इच्छितात. त्यामुळे डॉक्टर, रुग्णालय प्रशासन, राजकीय नेते आपल्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून जास्त संवेदनशील असतात.

या लाटेत तुम्हीच चालवा होडी : येथे सर्व कामे तुम्हालाच करावी लागतील. खरेदी कराव्या लागणा-या प्रत्येक वस्तूची यादी रुग्णालयांना द्या. निविदा भरण्यासाठी संभाव्य पुरवठादार शोधा. रुग्णाला वाचवण्याऐवजी येथे अशा गोष्टींसाठी वेळ खर्च करावा लागतो.

मला फक्त बढती हवी : हे निराशाजनक पण कटू सत्य आहे. प्रकरण नोकरीशी संबंधित असेल तर स्वत:ला वाचवतील. कामच करायचे नाही हा त्यावरचा सोपा उपाय. आपण स्मार्ट आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करणारे स्वत: मात्र काही काम करत नाहीत.

रुग्ण गेले खड्ड्यात : दुपारी ३ ते रात्री ११ दरम्यान डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतात त्या वेळीच पैशांच्या उलाढाली होतात. हे कटू सत्य आहे. अनेक डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतात. सरकारी रुग्णालयांत रुग्णांकडे कमी लक्ष दिले जाते.

कोणी ‘हो’ का नाही,’ म्हटल्यास ‘नाही’ समजा : भारतात येण्यापूर्वीच ही प्रवृत्ती माहीत होती. कुठल्याही कामाला ‘नाही’ म्हणता येत नसल्याने प्रत्येक जण ‘हो’ म्हणतो. करू शकत नसाल तर सांगा, मी पर्याय शोधेन.