आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्रेमीयुगुलाच्या FB वर जुळल्‍या साताजन्‍मांच्‍या गाठी, लग्‍नासाठी अमेरिकन युवती आली भारतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- प्रेम म्‍हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं, असे म्‍हटले जाते. प्रेमाला देश, धर्म, जात, वय या मर्यादा बंदीस्‍त करू शकत नाही. याची प्रचिती लखीमपूर खिरी येथे एक वर्षापूर्वी आली होती. फेसबुकवरच उत्तर प्रदेशातील हरदीपसिंग आणि अमेरिकेतील वर्जीनिया येथील नॅसीच्या साताजन्माच्या गाठी जुळल्या होत्या. नॅसी थेट लखीमपूर खिरी येथे हरदीपसिंगसोबत सातफेरे घेण्यासाठी आली‍ होती. खास लग्नासाठी भारताने तिला 10 वर्षांचा व्‍ह‍िसासुद्धा दिला आहे.

ओळख अशी बदलली नात्यात..
- नॅसी आणि हरदीपसिंगची ओळख 2015 मध्‍ये फेसबुकवर झाली. 
- व्‍हॉट्सअॅप मॅसेस आणि व्‍ह‍िडिओ चॅटिंग होऊ लागले. त्‍यातून त्‍यांचे प्रेम फुलत गेले. - दरम्‍यान, हरदीपसिंग याने आपल्‍या एका नातेवाईकाच्‍या लग्‍नासाठी नॅसीला आंमत्रित केले. 
- नॅसी 7 नोव्‍हेंबरला भारतात आली. दरम्‍यान, दोघांच्‍याही कुटुंबियांनी परवानगी दिल्‍यानंतर 25 नोव्‍हेंबरला नॅसी आणि हरदीपसिंगचा साखरपुडा झाला.

व्‍हेरीफिकेशनमुळे थांबले होते लग्‍न
नॅसी आणि हरदीप यांना लग्‍नासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार होती. जिल्‍हाधिकारी कार्यालयात असलेल्‍या एका लिपिकाने सांगितले की, भावी वधू ही भारताबाहेरील असल्‍याने या लग्‍नापूर्वी काही कागदपत्रांची गरज आहे. त्‍यासाठी आम्‍हाला अमेरिकेच्‍या पोलिसांचे व्‍हेरीफिकेशन आणि नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हवे आहे. दरम्‍यान, अमेरिकेमध्‍ये व्‍हेरीफिकेशनच ही प्रक्रियाच नसल्‍याने कागदपत्रांची पूर्तता कशी करणार, असा प्रश्‍न नॅसीने उपस्‍थ‍ित केला.

नॅसी शिकली पंजाबी आणि स्‍वयंपाक करणे 
भारतात आल्‍यानंतर नॅसी हिने हिंदी, पंजाबी आणि भारतीय पदार्थ बनवणे शिकत आहे. काहीच दिवसांत तिने बटर पनीर मसाला आणि पनीर आलू गोबी बनवणे शिकले असल्‍याचे हरदीपच्‍या नातेवाईकांनी सांगितले.

हरदीप करत आहे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स
कतर कंपनीमध्‍ये मॅनेजमेंट ऑफिसर या पदावर हरदीप याने दोन वर्षे काम केले. नंतर केरळमध्‍ये बिजनेस हॉटेल प्रेसिडेंसमध्‍ये बिझनेस डेव्‍हलपमेंट ऑफिसर म्‍हणूनही काही दिवस काम केले. आता तो हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असून, त्‍याचे वडील शेतकरी आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हरदीपसिंग आणि नॅसीचे काही फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...