आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American President Barack Obama Gets Emotional At Malia Leaving For College

मुलीला शिक्षणासाठी पाठवण्यासाठी दोन वर्षे मनाची तयारी करत होते बराक ओबामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आपल्या मुलींबरोबर

वॉशिंग्टन - जगातील कोणत्याही मोठ्या पदावर विराजमान झाल्यानंतरही आपल्या मुलांबाबतच्या भावना बदलत नसतात. त्यातही बाप लेकीचे नाते हे जास्त संवेदनशील असते. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्याबाबतीत असाच प्रत्यय आला आहे. ओबामांची मोठी मुलगी मालिया काही महिन्यांनंतर शिक्षणासाठी कॅलिफोर्नियाच्या स्‍टेनफोर्ड विद्यापीठात जाणार आहे. त्यामुळे मुलीपासून दूर व्हावे लागणार असल्याने बराक ओबामा उदास झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या क्षणासाठी मनाची तयारी करत असल्याचे ओबामा म्हणाले.

ओबामा दाम्पत्य झाले भावूक
ओबामा यांनी मॅसाच्युसेट्समध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, 'मालिया जेव्हा शिक्षणासाठी जाईल तेव्हा रडायचे नाही म्हणून मी स्वतः मनाची तयारी करत आहे. त्यामुळे माझे हे भाषणही त्याचीच तयारी आहे, असे मला वाटते.' त्यानंतर अशाच दुस-या एका कार्यक्रमात मिशेल ओबामा यांनीही त्यांच्या वेदना जगजाहीर केल्या. त्या म्हणाल्या, 'अशा प्रकारच्या कार्यक्रमात आल्यानंतर मला मुलींबाबत विचार आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे जर मी भावूक झाले, तर मला माफ करा. '

मीडियाला तोंड द्यावे लागणार
16 वर्षीय मालियाने काही दिवसांपूर्वीच स्‍टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीचा दौरा केला. ती जेव्हा याठिकाणी शिक्षणासाठी जाईल, त्यावेळी घरची आठवण येण्याशिवाय तिला इतरही अनेक बाबींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यापैकीच एक म्हणजे मिडिया. पहिल्या दिवशी जेव्हा ती महाविद्यालयात जाईल त्यावेळी तिला सामना माध्यमांच्या प्रतिनिधीबरोबर होईल. यापूर्वी स्‍टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये अमेरिकेचे राष्‍ट्रपती बिल क्लिंटन यांची मुलगी चेल्सिया हिनेही शिक्षण घेतले आहे. ती 1996 मध्ये जेव्हा आपली आई हिलरी क्लिंटन यांच्यारोबर महाविद्यालयाच पोहोचली होती, त्यावेळी तिला पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे द्यावी लागली होती.

पुढील स्लाइडवर पाहा ओबामा आणि मिशेल यांचे मुलींबरोबरचे काही PHOTO