आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन विद्यार्थिनीला लखनौत छेडले; स्व रक्षणासाठी घेतली रिक्क्षातून उडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये एका अमेरिकन तरुणीची छेड काढल्याचे उघडकीस आले आहे. ही तरुणी विद्यार्थिनी असून ती रिक्षाने प्रवास करत होती. विद्यार्थिनीने स्व रक्षणासाठी धावत्या रिक्षातून उडी घ्यावी लागली होती. पीडित तरुणी किरकोळ जखमी झाली असून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित विद्यार्थिनी तुलियागंज येथे रिक्षात बसली होती. तिच्यासोबत अन्य प्रवाशीही होते. परंतु ते त्यांच्या स्टॉपवर उतरल्यानंतर रिक्षा ड्रायव्हरसह त्याचे दोन साथीदार्‍यांनी तिची छेड काढण्यास सुरुवात केली. तिने आरडाओरड केली असता त्यांनी म्यूझिक प्लेअरचा आवाज वाढवला. परंतु पीडितेने प्रसंगावधान राखून धावत्या रिक्षातून खाली उडी घेतली. त्यानंतर रिक्षाचा क्रमांक लिहून पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तिने आपबिती सांग‍ितल्यानंतर पोलिसांनी रिक्षा ड्रायव्हर वीरु आणि तिचे मित्र राजन आणि आयुष या भामट्यांना ताब्यात घेतले आहे.

पीडित तरुणी अमेरिकेतील असून लखनौ येथील गोखले मार्गावरील एका संस्थेत शिक्षण घेत आहे. इंदिरा नगर येथे भाड्याच्या घरात ती राहते. पीडित तरुणीच्या उपस्थित आरोपींची परेड घेतली जाणार असल्याचे महिला पोलिस स्टेशनच्या प्रभारी शिवा शुक्ला यांनी सांगितले.