आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amethi Palatial Feud Comes Open, Sanjay Singh\'s First Wife Demands Equal Rights

अमेठी राजघराण्याचा वाद चव्हाट्यावर; 20 कोटींसाठी गरिमा सिंह यांनी मुलाला भडकावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : राज्‍यसभा खासदार संजय सिंह यांचे पुत्र अनंत सिंह, गरिमा आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य.

अमेठी - अमेठीच्या राजघराण्यात संपत्तीवरून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला वाद आणखी वाढला आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि अमेठीच्या राजघराण्याचे वारस संजय सिंह यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी गरिमा सिंह यांच्यवर 20 कोटी रुपयांसाठी मुलाला भडकावल्याचा आरोप केला आहे. तर 18 वर्षांनी परतलेल्या गरिमा सिंह यांनी संजय यांच्या दुस-या पत्नी अमिता सिंह यांना राजवाड्यात पाय ठेवू देणार नसल्याचे म्हटले आहे. संजय यांच्यशी आपला घटस्फोट झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. गरिमा यांचा मुलगा अनंतने अमितावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

संपत्तीचा वाद
गरिमा सिंह या 18 वर्षांनंतर आपला हक्क असल्याचा दावा करत परतल्या आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा अनंत आणि मुली महिमा आणि शैव्‍या याही आहेत. संजय सिंह यांनी गरिमा यांना 20 वर्षांपूर्वीच घटस्फोट दिल्याचे म्हटले आहे. पण तो घटस्फोट बनावट होता आणि आपण कोणत्याही कागदावर सह्या केल्या नसल्याचे गरिमा यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने हा घटस्फोट फेटाळला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे गरिमा यांनी त्यांची मुले आणि नातवंडांसह राजवाड्याचा ताबा घेतला असून आपल्या हक्काची मागणी करत आहेत.

गरिमा म्हणाल्या - अमिताला पाय ठेवू देणार नाही
गरिमा सिंह म्हणाल्या, कुटुंब आणि नव-याच्या अब्रुसाठी गेल्या व्रषांपासून मी शांत होते. मला वाटले होते की, माझ्या मुलांना न्याय मिळेल. पण जेव्हा त्यांनी माझ्या मुलांचे सामान राजवाड्याबाहेर फेकले त्यावेळी मी याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. मी कायद्यानुसार त्यांची पत्नी आहे, अद्याप आमचा घटस्फोट झालेला नाही. त्यामुळे याठिकाणी राहणे हा माझा आणि माझ्या मुलांचा अधिकार आहे. हे राजासाहेबांचे घर असल्याने तेही येऊ शकतात. पण अमिताला येथे येण्याचा काहीही अधिकार नाही, असे त्या म्हणाल्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा राजघराण्याती इतर सदस्यांचे फोटो...