आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amethi Royal Family News In Marathi, Divya Marathi

अमेठीच्या राजघराण्यात संघर्ष, धुमश्चक्रीत पोलिसाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी - काँग्रेसचे राज्यसभा सदस्य संजय सिंह आणि त्यांचा मुलगा अनंत विक्रम सिंह यांच्यात वारसाहक्कावरून रविवारी वाद चिघळला. अनंतसिंह यांचे समर्थक आणि पोलिस यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाल्याचे पाहायला िमळाले. त्यात एक पोलिस ठार तर सहा जण जखमी झाले.

संजय िसंह व त्यांची पत्नी अमिता रविवारी लखनऊ येथून अमेठीकडे कोर्टात हजर होण्यासाठी येण्यापूर्वीच हा संघर्ष झाला. वादाच्या केंद्रस्थानी ‘भूपती भवन ’ आहे. सकाळी अनंत सिंह यांचे समर्थक या निवासस्थानाच्या बाहेर जमा झाले होते. त्याच वेळी अनंत यांच्या अंगरक्षकांचा पोलिसांसोबत वाद झाला. त्यानंतर समर्थक भडकले. त्यांनी जोरदार दगडफेक केली. त्यातून आणखी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावर जमाव चांगलाच भडकला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अगोदर लाठीमार केला. त्यानंतर त्यांना गोळीबार करावा लागला. त्यात कॉन्स्टेबल िवजय मशि्रा (४५) यांना गोळी लागली. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी या वेळी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

बाप-मुलाचे नेमके काय िबनसले ?
अनंत विक्रम व त्यांची आई तथा संजय यांची पहिली पत्नी गरिमा हे दोघे या वंशपरंपरागत बंगल्यात राहतात. त्यांचा या बंगल्यावर ताबा असल्याने त्याला संजय सिंह व त्यांची दुसरी पत्नी अमिता यांचा विराेध आहे. त्यातूनच हा वाद चव्हाट्यावर आल्याचे सांगितले जाते.

मृताच्या कुटुंबीयांना २० लाख
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी घटनेला सामोरे जाणारे मशि्रा यांच्या धैर्याचा गौरव करतानाच त्यांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली.

सावत्रआईला िवरोध
संजय िसंह यांना बंगल्यात येण्यास आमचा िवरोध नाही. परंतु त्यांची पत्नी अमिता यांना मात्र आम्ही बंगल्यात येऊ देणार नाही, असा पवित्रा अनंत विक्रम यांनी घेतल्यानंतर ‘भूपती भवन’समोर त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी बंगल्याबाहेर जमली होती.