आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमित शहा केरळ दौऱ्यावर, 15 दिवस चालणाऱ्या जनरक्षा यात्रेला केले रवाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नूर (केरळ) - अमित शहा मंगळवारी केरळमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी दौऱ्याची सुरुवात तालिपरम्बा येथील राजाराजेश्वर मंदिरापासून केली. या मंदिरात शहांनी पूजा केली. मंदिराच्या सदस्यांनी शहांचे स्वागत केले. साधारण 30 मिनिटे ते मंदिरात होते. शहांनी मंदिराला सोन्याचा कळस अर्पण केला. त्यानंतर शहांच्या हस्ते भाजपच्या 'जनरक्षा यात्रे'ला रवाना करण्यात आले. पायान्नूर जिल्ह्यातून सुरु झालेली ही यात्रा 15 दिवस चालणार आहे. 
 
केरळात डावे आणि भाजपमध्ये टक्कर 
- केरळमध्ये सध्या डाव्या पक्षांचे सरकार आहे. भाजप पिनरई विजयन सरकारवर लाल दहशतवादाचा आरोप करत आले आहे. येथे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच हिंसाचार भडकत असतो. 
- भाजपने मंगळवारी जनरक्षा यात्रा रवाना करुन विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा एक प्रकारे नारळ फोडला आहे. 17 ऑक्टोबरला तिरुअनंतपूरम येथे या यात्रेची सांगता होईल. या यात्रेत 15 दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी विविध केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत. 
- वृत्तसंस्थेने म्हटल्यानुसार, 2001 पासून आतापर्यंत केरळमध्ये संघ आणि भाजपचे जवळपास 120 कार्यकर्ते मारले गेले आहे. एकट्या कन्नूरमध्ये हा आकडा 84 पर्यंत गेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात भाजपचे 14 लोक मारले गेले. 
- दुसरीकडे, सीपीआय-एम सरकारचा आरोप आहे की भाजप आणि संघाच्या स्वयंसेवकांनी राज्यात हिंसाचार पसरवला आहे. विरोधीपक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूमागे त्यांच्या पक्षाचा काही हात असल्याचा सीपीआय-एमने इनकार केला आहे. 
 
योगीही सहभागी होणार 
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील केरळमधील जनरक्षा यात्रेत सहभागी होणार आहेत. ते बुधवारी केरळमध्ये पोहोचतील. पक्षाध्यक्षांसह योगी जनरक्षा यात्रेत सहभागी होणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...