आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घराणेशाही विरुद्ध विकास यांच्यात लढत : अमित शहा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावनगर- गुजरात विधानसभा निवडणूक ही जातीयवादी आणि घराणेशाहीचे राजकारण विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाधारित कार्यक्रमांतील ही खरी लढत आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. शहा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हा टोला लगावला. 

 
राहुल यांच्या दृष्टीने गुजरात हे पर्यटनस्थळ असावे. त्यामुळे त्यांनी गुजरातचा दौरा काढला, असे शहा म्हणाले. मंगळवारी एका जाहीर सभेत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. काश्मीरला स्वायत्तता मिळावी या काँग्रेस नेते चिदंबरम यांच्या वक्तव्याबद्दल गांधींनी व पक्षाने भूमिका स्पष्ट करायला हवी. परंतु तसे झालेले नाही. म्हणूनच ही निवडणूक केवळ दोन पक्षांतील लढत राहत नाही. जातीयवाद, घराणेशाही विरूद्ध नरेंद्र मोदी यांच्या विकासवाद अशी आहे. यात मोदींचा विकासवाद जिंकेल, अशी मला खात्री आहे. भावनगर (पश्चिम) मतदारसंघातून प्रदेश पक्ष प्रमुख जितू वाघानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.  १९८५ व १९९५ मध्ये काँग्रेसने जातीय फूट पाडून सत्ता गाजवली हाेती. भाजपने १९९५ ते २०१७ पर्यंत विकास व स्थिर सरकार दिले, असे ते म्हणाले. 


‘खाम’ फॉर्म्युल्याचा  काँग्रेसचा पुन्हा डाव  
ऐंशी व नव्वदच्या दशकात काँग्रेसने मतपेटीचा खाम फॉर्म्युला तयार केला होता. हा फॉर्म्युला जातीयवादावर आधारित होता. काँग्रेसने तेव्हा राज्यातील क्षत्रिय, हरिजन, आदिवासी व मुस्लिम (इंग्रजी वर्णाक्षरानुसार ‘खाम’) या समुदायाय फूट पाडून विजय मिळवला होता. या वेळी काँग्रेसने प्रचार मोहिमेचे आऊटसोर्सिंग केले आहे. परंतु लोकांना आता घराणेशाही किंवा विकासवादातून एकाची निवड करावी लागेल, असे शहा यांनी सांगितले.  


‘बुलेट ट्रेन’,‘रो-रो’  मोदींनी दिले..  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची सूत्रे घेतल्यानंतर राज्याला बुलेट ट्रेन व रो-रो सेवा दिली आहे. त्याचबरोबर सौराष्ट्राला आंतरराष्ट्रीय विमानतळ दिले आहे. त्याचबरोबर गुजरातचे प्रलंबित प्रश्नही सोडवले आहेत. त्याचा लाभ राज्यातील जनतेला होणार आहे, याची आठवण शहा यांनी करून दिली.  


रोहिंग्यांवर काँग्रेसने भूमिका  स्पष्ट करावी 
भारताने अंतर्गत सुरक्षेशी खेळणे योग्य होईल का? देशाने सुरक्षेबद्दल तडजोड मान्य करावी का? गुजरातच्या लोकांनी काँग्रेसला त्यांची भूमिका स्पष्ट करण्याबद्दल विचारणा करावी. रोहिंग्या मुस्लिमांबद्दल काँग्रेसचे म्हणणे काय ते स्पष्ट व्हायला हवे, असे शहा म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...