आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहा 1 जुलैपासून दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
पणजी - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे 1 आणि 2 जुलै रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. गोवा प्रदेश भाजपतर्फे त्यांच्या जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे. पंडीत दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त अमित शहा हे देशभरातील सर्व राज्यांचा दौरा करीत आहेत.

1 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन होईल. तिथे भव्य स्वागत केले जाईल. दुपारी 12 वाजता ते राजधानी पणजीत आझाद मैदानाला भेट देऊन तिथे हुतात्म्यांना आदरांजली वाहतील. यानंतर 4 वाजता अलिकडेच पार पडलेल्या पंचायत निवडणुकीतील विजयी पंचसदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच जिल्हा पंचायत सदस्यांसोबत वार्तालाप करतील. संध्याकाळी 6 वाजता राज्यातील काही आमंत्रित व्यवसायिकांसोबत त्यांची बैठक होणार आहे. 
 
2 जुलै रोजी सकाळी मडगाव येथे भाजप दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. आपल्या या भेटीत ते भाजप प्रदेश समिती, मंत्री, आमदार यांची भेट घेतली तसेच भाजप आघाडीचे घटक असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि मगो पक्षाच्या नेत्यांसोबतही चर्चा करतील. आगामी राष्ट्रपती निवडणूक आणि राज्यसभा निवडणूकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण चर्चा होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...