आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amit Shah News In Marathi, BJP President, Divya Marathi

पटेलांनी काश्मीर हाताळले असते तर ‘पाकव्याप्त काश्मीर ’ नसता, अमित शहा यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिदर - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याऐवजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी काश्मीर मुद्दा हाताळला असता तर पाकव्याप्त काश्मीर अस्तित्वात आला नसता तसेच ३७० कलमही राहिले नसते, असे मत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले. बीदर जिल्ह्यातील गोरटा गावात सरदार पटेल व हुतात्मा स्मारकाच्या कोनशिला समारंभात ते बाेलत होते.

सद्य:स्थितीत काश्मीरचा बहुतांश भाग पािकस्तानच्या ताब्यात आहे. पंडित नेहरूंऐवजी सरदार पटेलांकडे काश्मीर मुद्दा सोपवला असता तर पाकव्याप्त काश्मीर व कलम ३७० राहिले नसते हे सांगण्यास आपणाला संकोच वाटत नसल्याचे शहा म्हणाले. पटेल यांचा दृढ संकल्प आिण लोकांना समजण्याच्या क्षमतेमुळे आपण एकत्र आहोत. या गाेरटा गाव दक्षिण भारतातील जालियनवाला बाग म्हणून ओळखले जाते. ९ मे १९४८ रोजी गावातील लोकांनी तिरंगा फडकावल्यावरून निझामाने २०० जणांची हत्या केली होती.