आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानपुरात BJP Vs BJP? नरेंद्र मोदी- अमित शहांच्या पोस्टरला फासले काळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आज (शनिवार) कानपूर शहरात दाखल झाले आहेत. मात्र, पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे कानपुरात भाजपविरुद्ध भाजप अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून भाजपविरोधात घोषणाबाजी करत अमित शहा यांना विरोध केला. दुसरीकडे, शहारातील काही भागात अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर्सला काळे फासण्यात आले आहे.

'श्रीमान, अमित शहा सर. यूपीमध्ये भाजपचे प्रचंड हाल आहेत. सर्व आपापल्या कामात मस्त आहे. अशा स्थितीत 'यूपी 2017'चे काय?', असा मजकूर लिहिलेले बॅनर घेऊन काही कार्यकर्ते शहरात फिरत आहेत.
दरम्यान, अमित शहा यांच्या स्वागतासाठी भाजपच्या कानपूर शाखेने शहरातील अनेक भागात पोस्टर्स लावले होते. जवळपास सहा पोस्टर्सवर अज्ञात लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या चेहर्‍याला काळे फासले आहे. या प्रकारावर भाजपचे कार्यकर्ता संतापले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर अमित शहा पहिल्यांदा कानपूरमध्ये आले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...