आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखपूरमध्ये शहा म्हणाले, प्रियांकाबाबत मला नाही, प्रवक्त्यांना विचारा, ती माझी लेव्हल नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमित शाह म्हणाले, भाजप संपूर्ण बहुमताने निवडणून सत्ता स्थापन करणार आहे. सगळीकडे भाजपने चांगला लढा दिला आहे. - Divya Marathi
अमित शाह म्हणाले, भाजप संपूर्ण बहुमताने निवडणून सत्ता स्थापन करणार आहे. सगळीकडे भाजपने चांगला लढा दिला आहे.
गोरखपूर - उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गोरखपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. निवडणुकांपूर्वी वाटत होते की लाट आहे पण आता त्सुनामी येणार असे दिसत असल्याचे शाह याठिकाणी बोलताना म्हणाले. प्रियंकाबाबत विचारले असता ते म्हणाले, याबाबत तुम्ही प्रवक्त्यांना विचारा, हे सांगण्याची माझी लेव्हल नाही. 

लोकांना बदल हवा आहे..  
- अमित शहा पुढे म्हणाले, भाजप संपूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करणार आहे. सगळीकडे भाजपने चांगली लढत दिली आहे. 
- आतापर्यंत झालेल्या मतदानामध्ये लोकांनी भाजपला भरभरुन मते दिल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. त्यामुळे लोकांना परिवर्तन हवे असल्याचे स्पष्ट आहे. 
- दोन तृतीयांश बहुमताने निवडून येईल भाजप सरकार. प्रत्येक जागेवर भाजप पहिल्या क्रमांकावर. 

प्रियंकाच्या प्रश्नावर शहा म्हणाले, लेव्हल राहू द्या 
- प्रियंका गांधींनी युपीला कोणत्याही दत्तक मुलाची गरज नसल्याचे म्हटले आहे, त्यावर पत्रकारांनी अमित शहा यांना प्रश्न विचारला. 
- या प्रश्नाचे उत्तर देताना अमित शहा म्हणाले, त्यांच्या वक्तव्यावर पक्षाच्या एखाद्या प्रवक्त्यांनी उत्तर द्यायला हवे. हसतच ते म्हणाले, त्यांच्याबाबत बोलणे माझ्या लेव्हलचे नाही. 

काँग्रेस-सपा आघाडी केवळ सत्तेसाठी 
- अमित शहा यांनी सपा-काँग्रेस आघाडीवर टिका करताना दोघेही लालचेपोटी एकत्र आल्याची टीका केली आहे. ही दोन भ्रष्टाचारी गटांची आघाडी असल्याचेही ते म्हणाले. 
- आघाडी करून अखिलेश यांनी पराभव स्वीकारला आहे. अखिलेश यांच्या विजयाचा आत्मविश्वास नसल्याचेही ते म्हणाले. 
- सध्या सुप्री कोर्टाने अखिलेश यांच्या एका मंत्र्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अखिलेश त्याबाबत मौन बाळगून आहेत. 

विकासाच्या नावावर विश्वासघात 
- संपूर्ण उत्तरप्रदेशात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. याठिकाणी शेतकरी, व्यावसायिक, तरुण, महिला आणि सर्व स्तरातील लोकांमध्ये असुरक्षितता आहे. 
- लखनौमध्ये एका महिन्यात 10 लोक मेट्रोत बसायला गेले आणि निराश होऊन परतले. कारण मेट्रो चाललीच नाही. 
- चालणारच नाही अशा मेट्रोला हिरवी झेंडी दाखवण्याचा फायदाच काय. अखिलेश यांनी विकासाच्या नावावर विश्वासघात केला आहे, असेही शहा म्हणाले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...