आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amit Shah Should Quit BJP President's Post Ompal Singh

अमित शहा यांनी अध्यक्षपद सोडावे, माजी खा. आेमपाल सिंह निदार यांचे वक्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धार- बिहार निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी हिंदी कवी तथा पक्षाचे माजी खासदार आेमपाल सिंह निदार यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. म्हणूनच अध्यक्ष हा उत्तर प्रदेशातील असला पाहिजे. उत्तर प्रदेशातील व्यक्तीला हे पद दिले गेल्यास त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळू शकतो. निवडणुकीत त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो. एवढेच नव्हे तर देशभरात पक्षासाठी ही बाब चांगली ठरेल, असा विश्वास निदार यांनी व्यक्त केला.