आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amit Shaha Criticized Lalu And Nitish's New Front

राजकारण : लालू-नितीश मनोमिलनावर शहा म्हणाले, शून्य आणि शून्य !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नfतीशकुमार बिहारमध्ये जंगलराज आणू इच्छित असल्याचे म्हटले आहे. नितीश आणि लालूप्रसाद दोघे एकत्र आले तरी ते भाजपला रोखू शकत नाहीत. दोघांचे स्थान शून्यापेक्षा जास्त नाही. दोन शून्यांची किंमत काहीच नसते, ती शून्यच असते. दोघांनी महाआघाडी केली तरी भाजप दोन तृतीयांश बहुमतासह बिहारमध्ये राज्यात सत्तेवर येईल.

नव्या भूसंपादन कायद्यावरून विरोधक संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप शहा यांनी केला. या अध्यादेशामुळे देशाची एक इंच जमीनही कोणत्याही कॉर्पोरेट घराण्याकडे जाणार नाही. जमीन गावांच्या संपूर्ण विकासासाठी असेल. त्यांनी भूसंपादनाच्या मुद्द्यावरून नितीशकुमार यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, राज्यातील १२ साखर कारखान्यांच्या जमिनी कोणाकडे आहेत हे त्यांनी आधी सांगावे. यामध्ये मॉल कोणाचे झाले? तुम्ही निकटवर्तीय आणि मंत्र्यांच्या लोकांना मदत केली आणि आता केंद्र सरकारवर आरोप लावत आहात. बिहार परिवर्तनाची जननी आहे. इथे भाजपला सरकार स्थापण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

स्पेशल पॅकेजपेक्षा जास्त दिले
गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, केंद्र सरकारने बिहारला स्पेशल पॅकेजपेक्षा जास्त दिले आहे. राज्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय महसुलात राज्यांचा वाटा ४२ टक्के केला आहे. यामुळे बिहारला आधीपेक्षा अधिक निधी मिळत आहे. केंद्र सरकार बिहार आणि बंगालला २० हजार कोटी रुपये अतिरिक्त मदत देणार आहे. पाहणीत केंद्र सरकार चांगले काम करत आहे.

भाजपला चारवर बाद करू : लालू
राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून शून्य संबोधल्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला. निवडणूक येऊ द्या, भाजपला चार जागांवर बाद करू, असे ते म्हणाले. संपूर्ण देशात दहशतवाद आणि भीतीचे वातावरण केल्यानंतर आता भाजपचे लोक पाटलीपुत्रमध्ये आले आहेत. पाटलीपुत्रला बदनाम करण्याची त्यांची इच्छा आहे. शहा डरपोक आहेत. पतन सुरू झाले असून बिहारमध्ये भाजप संपुष्टात येईल.