आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप 5-10 नव्हे, 50 वर्षे सत्तेवर राहणार- शहा, राष्ट्रव्यापी दौऱ्यानिमित्त मध्य प्रदेशात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - भारतीय जनता पक्ष केवळ पाच-दहा वर्षे नव्हे, तर पन्नास वर्षे सत्तेवर राहणार आहे, असे सांगून पक्ष कार्यकर्त्यांनी त्यासाठी पक्षाची शक्ती वाढवली पाहिजे. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात पक्ष पोहोचवण्याचे काम करावे लागेल, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे.
 
सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे. विविध राज्यांत मिळून हजार ३८७ आमदारही आहेत. त्यामुळे बहुमत वाटते. परंतु अजूनही खूप करायचे बाकी आहे, ही समर्पित कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाचे ३३० खासदार, हजाराहून अधिक आमदार आहेत. म्हणूनच आम्ही केवळ ते १० वर्षे सत्ता गाजवण्यासाठी आलेलो नाही. आम्हाला किमान पन्नास वर्षे सत्तेवर राहून देशसेवा करायची आहे. व्यापक परिवर्तन घडवून आणायचे आहे. सत्तेच्या माध्यमातून देशात हा बदल घडवण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे शहा म्हणाले. भाजपच्या कार्यकारिणीच्या मुख्यालयातील बैठकीत शुक्रवारी त्यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला आमदार, खासदार, जिल्हाप्रमुखांची उपस्थिती होती.
 
काश्मीर ते कन्याकुमारी कामरूप ते कच्छपर्यंत भाजपचा ध्वज फडकवणार
भाजपलाभारताच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. भाजपचा ध्वज नसेल असे एकही ठिकाणी राहणार नाही, यासाठी प्रत्येक कार्यकर्ता समर्पण भावनेतून प्रयत्न करणार आहे. त्यातून पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे. त्याचाच अर्थ पक्ष संघटन मजबूत होईल. परंतु या सर्वांचा पाया मात्र चारित्र्य हाच आहे. त्याच्या जोरावरच पक्षाची वाटचाल सुरू आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि कामरूप ते कच्छपर्यंत पक्ष सर्वत्र पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांचे योगदान माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे अमित शहा म्हणाले.
 
११० दिवसांच्या राष्ट्रव्यापी दौऱ्यानिमित्त मध्य प्रदेशात
अमितशहा देशव्यापी दौऱ्यावर असून त्याअंतर्गत शुक्रवारपासून ते तीनदिवसीय मध्य प्रदेश मुक्कामी आहेत. त्यांचा देशव्यापी दौरा ११० दिवस चालणार आहे. या दौऱ्यात ते पक्ष कार्यालयातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...