आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशचा विकास ‘राहू’-‘केतू’मुळे ठप्प, अमित शहांचा सपा-बसपवर हल्लाबोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मउ - उत्तर प्रदेशला समाजवादी पार्टी व बहुजन समाज पक्षाच्या रूपाने ‘राहू’, ‘केतू’ लागले आहेत. दोन्ही पक्ष राज्याचा विकास होऊ देत नसल्याने ठप्प झाला आहे, असा हल्लाबोल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

राज्याच्या विकासाला राहू-केतूचे ग्रहण लागले आहे. सपा-बसपची राजवट असेपर्यंत राज्याचा विकास होऊ शकत नाही. विकासाचा रथ देशभरात वाटचाल करू लागला आहे. परंतु तो उत्तर प्रदेशात रुतून बसला आहे. राज्यातील सरकारला मात्र विकासाची गंगा जनतेपर्यंत पोहाेचू द्यायची नाही, असे शहा म्हणाले. भाजप व भारतीय समाज पार्टीच्या वतीने संयुक्त आयोजित सभेत ते शनिवारी बोलत होते. भारतीय समाज पार्टीचे संस्थापक आेम प्रकाश राजभार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप व भारतीय समाज पार्टी यांची आघाडी नव्हती. तरीही दोन्ही पक्षांना ८० पैकी ७३ जागी विजय संपादन करण्यात यश आले हाेतेे. आता मात्र चित्र वेगळे आहे, असा दावा त्यांनी केला.

आपल्या भाषणातून शहा यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. जन धन, मुद्रा बँक इत्यादीच्या माध्यमातून गरीब, गरजूंना संधी उपलब्ध झाली आहे. उत्तर प्रदेशातील जनतेलाही त्याचा निश्चितपणे फायदा होईल. महाराष्ट्र, गुजरातमध्ये पूर्वांचलचे तरुण नोकरीसाठी जातात. देश समृद्ध होत आहे. उत्तर प्रदेश पिछाडीवर आहे. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचा पार बोजवारा उडाल्याने मध्यंतरी बसपा नेत्या मायावती यांनी सपावर जोरदार टीका केली होती. त्याचबरोबर आता राज्यातील जनतेसमोर एकमेव पर्याय असल्याचा दावाही केला होता.
राज्याला साडेतीन मुख्यमंत्री
राज्याचा कारभार साडेतीन मुख्यमंत्री पाहत आहेत, असे शहा म्हणाले. पहिले मुख्यमंत्री अखिलेश (यादव), दुसरे नेताजी (मुलायम), त्यांचे (अखिलेश) दोन काका व मोहंमद आझम खान हे मुख्यमंत्री होऊन कारभार हाकतात.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...