आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरदार पटेल यांच्या जन्‍मस्‍थळी शहांची सभा; मंचावर येताच पाटीदारांनी फेकल्या खुर्च्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा भलेही झाली नसली तरी भाजप आणि काँग्रेस दोघांनीही राज्यात निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे. दोघांचीही निवडणूक यात्रा पटेलबहुल सौराष्ट्रातून सुरू झाली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याच आठवड्यात ‘नवसर्जन गुजरात यात्रा’ काढली होती.
 
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे जन्मस्थान करमसद येथून ‘गुजरात गौरव यात्रा’ रवाना केली. त्यानंतर अमित शहांनी एका जाहीर सभेत संबोधित केले. शहा मंचावर येताच पाटीदार युवकांनी त्यांच्याविरोधात घोषणा देणे सुरू केले. त्यांनी खुर्च्याही फेकल्या. शहा यांना आधीही गुजरातमध्ये विरोध झाला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना ‘भारतरत्न’ उशिरा दिल्याबद्दल अमित शहांनी काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहा यांची ही सभा म्हणजे राहुल यांच्या सौराष्ट्र यात्रेला उत्तर मानले जात आहे. तीत त्यांनी पटेलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. आता भाजपने नाराज पटेल समुदायाला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात पटेलांची संख्या २०% आहे. ते राज्यात १८२ पैकी ७३ जागांवर विजय-पराजयात निर्णायक भूमिका वठवतात.
 
१५ दिवस यात्रा 
‘गुजरात गौरव यात्रा’ १ ते १५ ऑक्टोबरपर्यंत चालेल. १३८ सभा होतील. यात्रेचे दोन मार्ग आहेत. त्यांची जबाबदारी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि प्रदेशाध्यक्ष जीतूभाई वघानींकडे आहे.
 
पटेल यामुळे महत्त्वाचे
दोन दशकांपासून पाटीदारांच्या मतांमुळे भाजपचा गुजरातमध्ये विजय
पाटीदारांना वळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत ते राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. राज्यात सुमारे २०% पाटीदार आहेत. भाजप, काँग्रेस दोघांकडेही, पाटीदार वगळता, सारखी म्हणजे ४२-४२ टक्के मते आहेत. पाटीदारांची दोन दशकांपासून भाजपला सत्तेत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका.
८०% पाटीदारांची मते २०१२ च्या निवडणुकीत भाजपला मिळाली
पटेलांमध्ये लेवा आणि कडवा हे दोन उपसमुदाय आहेत. हार्दिक कडवा पटेल तर केशुभाई पटेल लेवा पटेल समुदायाचे आहेत. १९९० च्या दशकापासूनच े ८०% पटेल भाजपला मते देत आहेत. पाटीदार समुदायात लेवा ६०% आणि कडवा ४०% आहेत. २०१२ मध्ये भाजपला ६३% लेवा आणि ८२% कडवांची मते मिळाली होती.
तीन निवडणुकांत विजय-पराजयात १०% मतांचा होता फरक
काँग्रेसला १९८५ मध्ये ५५.६% मते मिळाली होती. २०१२ मध्ये ती ३८.९% पर्यंत गेली. भाजपचा आलेख १५% वरून ४८% पर्यंत गेला. गेल्या ३ निवडणुकांत भाजपला ४६-५०% मते मिळाली. दर वेळी भाजप-काँग्रेसमध्ये १०% मतांचे अंतर होते.
 
मोदींनी राज्यात प्रथम २००२ मध्ये काढली होती यात्रा
‘‘गुजरात गौरव यात्रे’चा हा दुसरा टप्पा आहे. नरेंद्र मोदी यांनी २००२ मध्ये सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी २००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकीआधीही यात्रा काढली होती. या यात्रेद्वारे भाजपने गावापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात्रा ग्रामीण गुजरातच्या १४९ जागांतून जाईल. ती ४,५६७ किमी अंतर कापेल.
 
अभेद्य गड वाचवण्यासाठी भाजपने लावली ताकद
गुजरातमध्ये भाजप १९९५ पासून सत्तेत आहे. पक्षाने आपला अभेद्य किल्ला वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. सुरुवात यूपी निवडणूक संपताच सुरू झाली होती. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यूपी निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी गुजरातला रवाना झाले होते. तेथे दोन दिवस राहिले होते आणि सोमनाथ मंदिरातही गेले होते.
 
राहुलना उत्तर : शहांनी निवडले सरदार पटेलांचे घर
राहुल सौराष्ट्रात पोहोचताच पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी त्यांचे स्वागत केले होते. त्यामुळे पटेलांचा कल काँग्रेसकडे राहू नये यासाठी भाजपने सरदार पटेल यांच्या घरापासूनच यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. २०१२ मध्ये भाजपला ४८% मते मिळाली होती, त्यात ११% पाटीदारांची होती. त्यामुळे या वेळी भाजपची सर्वात मोठी चिंता पाटीदार आहेत. कारण एक-तृतीयांश पाटीदारांनीही सत्तारूढ पक्षाला मत दिली नाहीत तर मुकाबला खूप कठीण होईल.
 
यामुळे सौराष्ट्राची निवड : ४० जागांवर वर्चस्व
गुजरातच्या राजकारणात सौराष्ट्र नेहमीच महत्त्वाचे आहे. राज्यातील विधासनभेच्या १८२ पैकी ५८ जागा याच भागात आहेत. ४० जागांवर पटेलांची निर्णायक भूमिका आहे. तेथे ५८ पैकी ३७ जागा सध्या भाजपकडे, तर काँग्रेसकडे १६ जागा आहेत. २०१५ मध्ये काँग्रेस ११ पैकी ८ जिल्हा पंचायतीत काँग्रेस विजयी झाली होती. तेव्हा पाटीदारांचे आंदोलन सुरू होते. सौराष्ट्राचा भाग शेतकऱ्यांचा आहे, पण आज या भागात भाजपबद्दल शेतकरी, दलित, पाटीदारांत असंतोष दिसतो.
बातम्या आणखी आहेत...