आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amma Hide Her Asset In 18 Companies Bangloru Special Court, Divya Marathi

संपत्ती दडवण्यासाठी अम्मांच्या १८ कंपन्या, बंगळुरूच्या विशेष न्यायालयाच्या आदेशातून खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक उत्पन्न प्रकरणात दोषी माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी हा पैसा दडवण्यासाठी १८ कंपन्या स्थापन केल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. या कंपन्या १९९१ ते १९९६ दरम्यान स्थापन करण्यात आल्या होत्या.

बंगळुरुच्या विशेष न्यायालयाच्या निकालातून संबंधित वास्तव समोर आले आहे. विशेष न्यायमूर्ती जॉन मायकेल डीकुन्हा म्हणाले, दहा कंपन्या एका दिवसात तयार झाल्या. त्यांचे नियम एकसारखे होते. मात्र, ज्या कामासाठी त्यांची स्थापन करण्यात आली, ते कामच तिथे झाले नाही. १९९१ मध्ये जयललिता आणि त्यांची निकटवर्तीयच शशिकला यांच्या जया पब्लिकेशन आणि शशी एंटरप्राजेस या दोन फर्म्स होत्या. शनिवारी न्यायालयाने जयललिता, शशिकला आिण त्यांच्या दोन नातेवाईकांना शिक्षा ठोठावली होती. जयललिता यांच्यावर १०० कोटी आणि अन्य आरोपींना प्रत्येकी १० कोटीचा दंड ठोठावण्यात आला होता.

व्हीआयपी ट्रिटमेंट नाही
कर्नाटकचे कारागृह महानिरीक्षक पी.एम. जयसिन्हा यांनी बंगळुरू तुरुंगात जयललिता यांना व्हीआयपी वागणूक दिली जात नसल्याचे सांगितले. त्यांना सामान्य कैद्यांप्रमाणेच वागवले जात आहे. जयललिता यांनी टीव्हीचीही मागणी केली नाही. ६६ वर्षीय जयललिता यांना कैदी क्रमांक ७४०२ मिळाला आहे. जयललिता तामिळनाडूचे तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. त्यांना व्हीव्हीआयपी कोठडी २३ मध्ये ठेवण्यात आले आहे. त्या रोज तीन इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात. त्यांची मैत्रीण शशिकला व भाची इलावारसी त्यांची देखभाल करतात. चार वर्षाची शिक्षा झाल्यामुळे तुरुंगाच्या मॅन्युअलनुसार त्यांना आपले कपडे वापरण्याची परवानगी आहे. तुरुंगाची साडी वापरणे त्यांच्यासाठी बंधनकारक नाही.