आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जयललितांच्या पोस्टरला दूधाने अंघोळ, तर संसदेत वाटली मिठाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयडीएमकेच्या प्रमुख जे. जयललिता यांच्यावरील आरोप कर्नाटक हायकोर्टाने मागे घेतल्यानंतर त्यांचे समर्थक सगळीकडे आनंद साजरा करताना दिसत आहेत.
बंगळूरु हायकोर्ट परिसरापासून ते माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या घरापर्यंत एआयएडीएमके समर्थक आनंद साजरा करताना दिसत आहेत. जयललिता यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सोशल मीडियावरदेखील प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे.
ट्विटर आणि फेसबुक या सोशल साइट्सवर जयललिता यांच्याशी संबंधित हॅशटॅग्स #JayaVerdict, #AmmaIsBack #MummyReturns ट्रेंडिंगमध्ये आले आहेत. तर दुसरीकडे चेन्नईमध्ये समर्थकांनी जयललिता यांच्या पोस्टरला दूधाने स्नान घातले आहे. तर, संसदेत त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी मिठाई वाटप करून आनंद साजरा केला आहे.
एआयएडीएमकेच्या वेबसाइटवर अम्मा इज बॅकचा संदेश
हायकोर्टाच्या निर्णयानंतर एआयएडीएमकेच्या वेबसाइटवर 'अम्मा इज बॅक' असा संदेश फिरत होता. वेबसाइटवर ग्राफिक्सचा वापर करून अम्मांच्या परतीची घोषणा करण्यात आली. जयललिता यांची सुटका झाल्यानंतर पक्षातर्फे नव्याने ऑनलाइन मेंबर बनवण्यास सुरूवात केली. पक्षाच्या वेबसाइटवर जयललिता यांचे वक्तव्यदेखील पोस्ट करण्यात आले आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वत:ला राजकारणाचा बळी असे म्हटले आहे.
जयललिता यांची सुटका झाल्यानंतर ट्विटरवर यूजर्सने खालील प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या...
* Mayank Gandhi (AAP) @mayankgandhi04: Jayalalitha, Salman Khan etc.This is a rich man's country!!!!

* Kiran Bedi @thekiranbedi: Fuuuuullllllllll Maaaarrrrkkkkksssss Tooooo Oooouuuuurrr Judddddiiicccaiillll Ssssyyyttttemmss..Meraaa Bharat Mahaann. Jaaay..Hiiiiind...

* Ashwin S Kumar @ashwinskumar: So Lady Luck prostrates in front of Amma!

* Rajasekar ‏@drrsmd99: The best people to give surprises in India???? The indian judges #JayaVerdict

* Sakti ‏@_Sakti_: Now Paneerselvam would be weeping inside his house. JJ again took his chance of becoming CM #JayaVerdict

* @goyalsanjeev: One reason why today's #JayaVerdict has done more good than harm >> Saved 233+ lives! Thank you #HC for saving lives!

* @KiranKS: While common people aim for Tatkal tickets, rich actors and politicians get #TatkalJudgments.#SalmanVerdict #JayaVerdict
पुढील स्लाइड्वर क्लिक करून पाहा, जयललिता यांच्या सुटकेनंतर आनंद साजरा करताना समर्थक आणि ट्वीट केलेले फोटो...